vv19सोशल साइट्सवरच्या ट्रेण्डना विषयाचं बंधन असं नाहीच नि ते नसावंही. म्हणूनच आजच्या या ट्रेण्ड्समध्ये केप्लर यान, सेल्फीज, सोशल अपडेट्स, बुक्स, सिनेमा नि सायकॉलॉजी अशा ट्रेण्ड्सचा समावेश दिसतोय.
सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडिओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट

‘केप्लर’ शोध
‘नासा’नं नव्या ग्रहांचा शोध घेण्यासाठी सोडलेल्या ‘केप्लर’ यानाला यश मिळालं असून त्यानं जीवसृष्टीची शक्यता असलेल्या आठ नवीन ग्रहांचा शोध लावलाय. त्यातल्या दोन ग्रहांचं पृथ्वीशी थोडं साम्य असून त्यांचा पृष्ठभागही पृथ्वीसारखाच खडकाळ आहे. या यानाचं प्रक्षेपण २००९ मध्ये करण्यात आलं होतं नि त्याच्या निरीक्षणांना या वर्षांत सुरुवात झालेय.  

सिनेमा सिनेमा..
vn20आत्तापर्यंत मदान, कार्यक्रम, बातम्या नि जाहिरात विश्वात झळकणारा सचिन तेंडुलकर आता मोठय़ा पडद्यावर पाहायला मिळणारेय. सचिनच्या आयुष्यावर बेतलेल्या सिनेमात खुद्द सचिन अभिनय करणारेय. देशभरातील जवळपास दोन हजार सिनेमागृहात प्रदíशत होणाऱ्या या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीये.
एक हजार आठवडे चाललेला चित्रपट म्हणून गौरवण्यात आलेला अनेकांचा लाडका चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे.’ या सिनेमाचा लेटेस्ट पोस्टमार्टम केलाय करन नि बिस्वा या यंगस्टर्सनी. या दुकलीनं यातला रोमान्स, ड्रामा वगरे सगळ्याच फॅक्टर्सवर कमेंट केल्यात. खरं तर हे सगळं वाचण्यापेक्षा तुम्ही तो व्हिडीओ बघाच ना एकदा..
http://www.moviereviewpreview.com/this-howlarious-review-of-srk-kajols-ddlj-will-make-you-think-hard-really-hard/29934/
 
शार्ली एब्दो नि इतर ट्रेण्ड्स..
पॅरिसमधील ‘शार्ली एब्दो’ या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या ऑफिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सगळ्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध करण्यात आला. हल्ल्याची माहिती कळताच सुरुवातीला अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा पुढं आला होता. आता या घटनेचे जागतिक परिमाणाच्या दृष्टीनं असणारे पलू आदी मुद्दे पुढं येत येत ही विचारांची विचारांशी असलेली लढाई आहे, भारतातही हे होऊ शकतं, हे मुद्देही पुढं येताहेत.
दुसरीकडं सुनंदा पुष्करचा रहस्यमय मृत्यू झाल्याचं मान्य होत आता या प्रकरणाची अधिक खोलवर चौकशी होणारेय. त्यामुळं सुनंदा पुष्कर, थरूर, सुनंदा मर्डर असे ट्रेण्ड ट्विटर नि फेसबुकवर होते.  
‘वर्ल्डकप’मधल्या ‘टीम इंडिया’च्या सिलेक्शनचीही बरीच चर्चा घडली. युवराजसिंगला संघाबाहेरच राहावं लागलंय. रवींद्र जाडेजा, अक्षर पटेलसह स्टुअर्ट बिन्नीला संधी मिळालेय. विशेषत: स्टुअर्टला मिळालेल्या संधीवर काहींनी प्रश्नचिन्ह उमटवलं तर काहींनी त्याची तारीफ करत तो प्रभावी ठरण्याची आशा व्यक्त केली.

सेल्फीचा कोर्स नि पीजे सेल्फी
vn17फ्रेण्ड्स, ‘यूके’मध्ये सेल्फी काढायला शिकवणारा एक महिन्याचा कोर्स सुरू होतोय. लेक्चर्स नि सेमिनार्समधून सेल्फी काढताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात, हे शिकवणार आहेत. सर्वाधिक ट्विट मिळवणारा –  ‘ऑस्कर सेल्फी’ काढणारा इलेन डिजिनर हे सेल्फी काढायचे धडे देणार असल्याचा बोलबाला आहे. आपल्याकडं असा कोर्स सुरू करण्यात आला, तर त्यात धडाधड अ‍ॅडमिशन घेतली जाईल हे तर शंभर टक्केनक्की. फक्त इलेनऐवजी सेल्फी टीचर कोण असेल, ते सध्या तरी तुम्ही इमॅजिनच करा.
‘सेल्फी पीजें’नीही सध्या सॉलिड धुमाकूळ घातलाय. व्हॉट्सअ‍ॅपवर हे सेल्फीचे पीजे प्रचंड व्हायरल झालेत. उदा.- ‘कुलकर्णी जेव्हा स्वत:च्या मोबाइलवर स्वत:चा फोटो काढतात, त्याला काय म्हणतात? ..कुल्फी.’ यातून सामान्य माणसं, सेलिब्रेटिज अशी माणसंच काय प्राणीही सुटलेले नाहीत.  उदाहरणार्थ ‘हा नागाचा नॉर्मल फोटो आणि हा सेल्फी.. हा वाघाचा, हा डुकराचा, कोंबडी नि माकडाचाही..’

अ इयर ऑफ बुक्स
सोशल साइट्सच्या नादामुळं यंगस्टर्सची वाचनाची आवड कमी होतेय, असं वारंवार नोंदवलं जातं. यावर तोडगा म्हणून नाही, पण ‘फेसबुक’च्या मार्क झकरबर्गनं वेगवेगळ्या विषयांवरचं एक पुस्तक वाचायचं ठरवून ‘अ इयर ऑफ बुक्स’ हे पेज सुरू केलंय. सुरुवातीलाच या पेजला लाखांनी लाइक्स मिळालेले आहेत. या पेजवर मेंबर्सना सजेशन्सही देता येतील. सो, तुम्हीही या पेजवर अ‍ॅक्टिव्ह व्हा नि पोस्ट करण्यासाठी तरी अधिकाधिक वाचते व्हा..

‘सोल कलर’
लहानपणी एक खेळ होता ‘कलर कलर विच कलर डू यू वॉण्ट?’ तसाच आपल्या मनाचा रंग आपल्याला ओळखता येतो का? फेसबुकवर सध्या ‘व्हॉट कलर इज युवर सोल?’ अशी िलक फिरतेय. त्यातल्या १० ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची उत्तरं द्यायची नि तुमचा रंग-तुमची पर्सनॅलिटी तुमच्या पुढय़ात हजर होते. अशा किती तरी सायकॉलॉजिकल टेस्ट सध्या अ‍ॅव्हेलेबल आहेत. त्यातलीच हीही. ओळखा तुमच्या ‘सोलचा कलर..’
http://bitecharge.com/play/soulcolor?sess=q1#q1

ट्विटरवर गोल्डन ग्लोब
vn18या आठवडय़ात ट्विटरवर ट्रेडिंगमध्ये होते गोल्डन ग्लोब अ‍ॅवॉर्ड सेरिमनीचे फोटो. ऑस्कर पुरस्कारांच्या आधी दर वर्षी गोल्डन ग्लोब या आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याची चर्चा असते. गोल्डन ग्लोब पुरस्काराचे मानकरी कोण याचे लाईव्ह अपडेट्स होतेच. नंतरही अनेक दिवस या पुरस्कारविजेत्यांची चर्चा आहे. अनेकांच्या दिल की धडकन असणाऱ्या हॉलिवूड सेलिब्रिटींचे रेड कार्पेट लुक ट्विट, रिट्विट होत होते. अनेकांनी त्यावर बेस्ट ड्रेस्ड सेलिब्रिटी कोण, सर्वात वाईट कोण दिसलं वगैरे गोष्टींची चर्चा केली. केट हडसन, जेनिफर लोपेझ, इमा स्टोन, अ‍ॅमी अ‍ॅडम्स यांचे फोटो ट्रेंडमध्ये होते.

आठवले ते पाठवले
सोशल मीडिया दर वेळी कुणा ना कुणाचा बकरा होतो. गेल्या आठवडय़ात ओमर अब्दुल्लांची बारी होती. सध्या कुणाची?
‘मेरे को आज कुछ नहीं आठवले, तो मैंने फक्त गुड मॉìनग पाठवले – कवी विचारू नका’ इथपासून ते ‘मैंने सबेरे खाई थी पनीर की हंडी. इसलिए मेरे को वाज रही हैं जोर से थंडी. लगी हैं मेरी इस तरह जिंदगी की कसोटी. अब मैं पेटाऊंगा घर के सामने शेकोटी. – कवी नेहमीचेच’ अशा अनेक चारोळ्यांचा पाऊस सध्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर पडतोय. ‘सुज्ञास अधिक सांगणे न लगे. कारण कवी नेहमीचेच आहेत..’