वाईन विथ डाईन..
सुला वाईन्सने ‘दिया रेड’ ही स्पुमान्टे पद्धतीने बनवलेली स्पार्किलग वाईन बाजारात आणली आहे. बोस्का कंपनीतील वाईनमेकर वोलिना बेस्का यांच्या तज्ञ देखरेखीखाली या वाईनची निर्मिती करण्यात आली आहे. ‘दिया रेड’ ही सौम्य चवीची आणि स्पार्किलग वाईनकडे झुकणारी असल्याने ती दुपारच्या जेवणापूर्वी घेण्यासाठी उत्तम आहे किंवा संध्याकाळच्या वा रात्रीच्या निवांत वेळेसाठीही अतिशय योग्य आहे. नसíगक वनस्पतींचा समावेश असलेली, इटालियन स्पुमान्टे पद्धतीच्या रेड वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण फक्त ८ टक्के असून स्पार्किलगसाठी स्वीट वाईनचे ते यथायोग्य  मिश्रण आहे.

उषा इंटरनॅशनलचे आकर्षक पंखे
उषा इंटरनॅशनलच्या वतीने लहान मुलांकरता कार्टून थीम असलेले रंगीबेरंगी पंखे आणले आहेत. कार्टुन म्हणजे मुलांचा जीव की प्राण. खास असे कार्टुनचे पंखे मुलांच्या रूममध्ये अवतरले तर मुलांनाही ते अधिक आवडेल हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून उषाने छोटा भीम, डोरेमॉन असे कॅरेक्टर आता चक्क आपल्या घरात आणले आहेत. लहान मुलांच्या खोलीची सजावट पूर्ण करण्यासाठी हे पंखे छोटा भीम – लाडो, छोटा भीम चुटकी, डोरेमॉनकॉप्टर आणि डोरेमॉन-बास्केटबॉल या चार मॉडेल्समध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत.

मेडिमिक्स फेस वॉश
आपण कुठेही बाहेर जाताना तोंड धुण्यासाठी फेस वॉशची टय़ुब हमखास आपल्या बॅगेत भरतो. कॅरी करण्यास अतिशय सुलभ असणारे फेस वॉश  ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. खास हिवाळ्याच्या सीझनला अनुसरून मेडिमिक्स फेस वॉश बाजारात आणला आहे. हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. हवा शुष्क व थंड असल्यामुळे त्वचेतील जल आद्र्रता शोषून घेते. अशा काळात आयुर्वेदाधारित उत्पादने वापरणे अधिक गरजेचे असल्याने त्यासाठीच मेडिमिक्स फेस वॉशची निर्मिती केली असल्याचा कंपनीचा दावा आहे. हा फेस वॉश कडुनिंब, हळद, कोरफड, मंजिष्ठा, लोध्रा व कुष्ठ अशा सहा आवश्यक वनौषधींच्या मिश्रणापासून बनलेला आहे.