गेल्या दोन दशकात खरेदीचा अनुभव आमूलाग्र बदललाय. शॉपिंग म्हणजे जिवाची जत्रा असा अनुभव देणारे मॉल उभे राहिले आणि काउंटरपलीकडचा दुकानदार हा इसम कालबाह्य़ व्हायला लागला. ‘और दिखाओ’ म्हणत त्याला सगळं दुकान खाली काढायला लावायचे दिवस आताच्या पिढीला माहितीही नाहीत. हल्ली दुकानदार नसतो तर ‘शॉपिंग असिस्टंट’  किंवा ‘पर्सनल शॉपर’ असतो. तोच आपल्याला काय चांगलं दिसेल ते सुचवतो. आपल्यासाठी मॉलमधली ‘बुटिक’ पालथी घालतो. खरेदी म्हणजे बाजारातली पायपीट हा समजही आता गेला. पाय दुखेपर्यंत गारेगार शॉपिंग मॉलमध्ये फिरतो आपण, पण उद्देश खरेदीचाच असतो असं नाही. ती असते जिवाची जत्रा. खरेदी तर हल्ली  एका क्लिकवर होतेय ना! हा सगळा बदलता शॉपिंग एक्सपीरिअन्स व्हिवा वर्धापनदिन विशेषांकातून मांडण्याचा हा प्रयत्न. भविष्यात हा अनुभव कसा असेल याचीही झलक यातून दिसेल.
छाया : संदीप दौंडकर