मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोलप्रकरणी हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
- सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरावरून राजकारण रंगू लागले
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- जमिनीच्या वादातून बिल्डरवर गोळीबार; प्रकृती चिंताजनक
- ताडोबाच्या बफरझोनमध्ये वनभ्रमंतीला चालना देण्याची मागणी
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
संगीत क्षेत्रात कायम नवनवे बदल होत आलेले आहेत. सध्या संगीत क्षेत्रात आणि तिने केलेलं संगीत याची जोरदार चर्चा सुरू आहे. खासकरून कॉलेज वर्तुळात स्नेहाने केलेले बदल रुचत आहे. लोकसंगीत आणि पाश्चात्त्य संगीत यांचा मिलाप करून स्नेहाने आपल्याला ओए लकी लकी ओए, भेजा फ्राय, गॅंग्ज ऑफ वासेपूर भाग १ आणि २ यासारख्या चित्रपटामध्ये आपल्याला जुन्या बाजाच्या संगीताची थोडी नव्याने ओळख करून दिली. त्यामुळे स्नेहा खानवलकर हे नाव अल्पावधीत सर्वाच्याच परिचयाचे झाले.
स्नेहा संगीत बनवताना कायम काहीतरी वेगळं करावं या हेतूने ते बनवते याचा प्रत्यय आपल्याला गॅंग्ज ऑफ वासेपूरमधील 'ओ वुमनिया' हे गाणं ऐकल्यावर आलेला आहे. स्नेहाला प्रत्यक्ष भेटून तिच्या संगीतमयी दुनियेची सफर आपल्याला घडणार आहे व्हिवा लाऊंजच्या माध्यमातून. या भेटीमध्ये खूप साऱ्या गप्पा तर होतीलच पण प्रत्यक्ष स्नेहाच्या तोंडूनही काही खास गाणी आपल्याला ऐकायला मिळतील. तेव्हा ही संधी दवडू नका.
तारीख : २३ जानेवारी २०१३
वेळ : दुपारी ३ वाजून ३० मिनिटे
स्थळ : पु.ल. देशपांडे मिनी थिएटर, प्रभादेवी
प्रवेश सर्वासाठी खुला आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















