सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडिओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट
‘विंडोज १०’ येतेय.
vn14‘विंडोज’प्रेमींसाठी एक खूशखबर. फेसबुकवरील ट्रेण्डमधील संदर्भानुसार ‘विंडोज १०’ ही नवीन ऑपरेटिंग सिस्टीम लॉन्च होणारेय. टेकसॅव्ही आणि गिकी जनतेमध्ये या संदर्भातल्या लिंक शेअर होताहेत. कधी, कसं, काय या संदर्भात चर्चा, मतं, अंदाज यांना उधाण आलंय.
जीवन म्हणजे क्रिकेट राजा..
आपलं क्रिकेटवरचं प्रेम ही काही सिद्ध करायची गोष्ट नाहीये. सामना कसोटी असो किंवा एकदिवसीय किंवा टी-20.. आपण त्याचे अपडेट्स घेतल्याशिवाय राहत नाही.  आपल्याला क्रिकेटर्सच्या लाइफमध्येही तेवढाच इंटरेस्ट असतो. त्यामुळंच ‘कॅप्टन कुल’ धोनीनं टेस्ट मॅचमधून अचानक रिटायर व्हायचं ठरवल्यावर एम एस धोनी, टेस्ट क्रिकेट, थँक्यू ढोनी असे ट्रेण्डस् अपडेट होऊन ट्विटर, फेसबुक, व्हॉटस् अॅपवर प्रतिक्रियांचा पाऊसच पडला. यूटय़ूबवरच्या ‘रिटायरमेंट अनाऊन्स’ व्हिडीयोला ६६ हजारांवर व्ह्य़ूज होते.
ओमरवरचा हंसी-मजाक
जम्मू-काश्मीर निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून फेसबुक आणि ट्विटरवर ओमर अब्दुला यांच्यावरच्या पोस्ट्स पटापट शेअर होताहेत. त्याची वादग्रस्त वक्तव्ये, ट्विटरवरच्या ट्विप्पण्या यांचा समाचार घेणाऱ्या काही पोस्ट आहेत. तर काही चित्रपटांतल्या व्यक्तिरेखांच्या अनुषंगानं कार्टूनसदृश फोटोही पोस्ट करण्यात आले आहेत. कधी ‘पीके’स्टाइल, कधी ‘बाजीगर’स्टाइल असणाऱ्या या फोटोंवर कमेंट्सही तेवढय़ाच जोरकसपणं केल्या गेल्या. कुठला ना कुठला राजकीय नेता या फेसबुक- ट्विटरकरांचा बकरा असतो. त्याच्यावरचे जोक्स आणि कमेंट्सना उधाण येतं. गेल्या आठवडय़ात तो मान ओमर अब्दुल्ला यांना मिळाल्याचं दिसतंय.
‘अनू आंटी’चा व्हिडीओ
vn15‘चांगला इंजिनीअर हो बाबा.. कल्याण होईल..’ असं ठसक्यात सांगणाऱ्या नि आपलं म्हणणं कसं खरं आहे ते दणकून सांगणाऱ्या काही काकू अनेकदा आपल्या आसपास असतात. तशाच आहेत या ‘यूटय़ूब’वरच्या अनू आंटी. ‘अनू आंटी – द इंजिनीअिरग अँथेम’ या व्हिडीओचा गेल्या आठवडय़ात चांगलाच बोलबाला झालाय. ‘हाऊ आय ब्रेव्ह्ड अनू आंटी अँण्ड को-फाऊंडेड अ मिलियन डॉलर कंपनी’ हे वरुण अग्रवालचं पुस्तक या ‘यूटय़ूब’वरच्या अनू आंटीचा बेस आहे. कायम दुसऱ्यांच्या आयुष्यात नाक खुपसणाऱ्या अनू आंटी आपल्या आसपास खूप दिसतात. दहावीनंतर सायन्स आणि बारावीनंतर इंजिनीअरिंग आणि मग एमबीए हाच रुळलेला मार्ग उत्तम. हे न करता उद्योजक वगैरे बनण्याची स्वप्नं बघणाऱ्यांना अनू आंटी भेटल्या की संपतंच सगळं. या आंटीचा आणि मुलांचा शिक्षणाकडे आणि एकूणच जीवनाकडं बघण्याचा दृष्टिकोन, त्याला रॅप म्युझिकची जोड असं अफलातून मिश्रण या व्हिडीओत दिसतं. या व्हिडीओला अपलोड झाल्यानंतर दोनच दिवसांत २ लाख ८३ हजार व्ह्य़ूज मिळाले.
https://www.youtube.com/watch?v=L61JqGGiSZw
‘बिग बी’चं ‘पिडली’ हिट
वर्षांच्या शेवटी चित्रपट प्रदíशत करून कायम चच्रेत राहणाऱ्या आमिर खानच्या ‘पीके’वर उलटसुलट चर्चा अजूनही सुरू आहे. पण आता सिनेमाप्रेमी सोशलाइट्सचं लक्ष आगामी चित्रपटांकडे लागलंय. ‘शमिताभ’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘बिग बी’ अर्थात अमिताभ बच्चन यांनी पिडली हे गाणं गायलंय. त्याला दोन लाखांच्या आसपास व्ह्य़ूज मिळालेत. ‘पॉण्डस’च्या जाहिरातीच्या माध्यमातून टीव्हीवर झळकणाऱ्या ‘हवाईजादे’ चित्रपटाचा ट्रेण्ड फेसबुकवर होता. त्याचा थिएटरिकल ट्रेलरही यूटय़ूबवर रिलीज झालाय.
उल्टापुल्टा फोटो
निरभ्र आकाश.. हिरवीगार घनदाट झाडी नि हवीशी वाटणारी शांतता.. आजकाल हे क्षण फार दुर्मीळ वाटतात नाही का.. पण तेच क्षण सेकंदभर अनुभवायला मिळाले तर.. नव्हे काहींनी ते व्हॉटस्अॅपवर अनुभवलेदेखील.. सुरुवातीला लिहिलं होतं की – ‘अमेिझग फोटोग्राफी. हा शेजारचा फोटो प्रथम सरळ आणि नंतर उलटा करून बघा..’ बस्स.. आणखी काय लिहू.. कारण हाच तो क्षण आहे तुम्हीही सेकंदभरासाठी रिलॅक्स व्हायचा..
राधिका कुंटे – viva.loksatta@gmail.com

सध्या आपल्या व्हेरी बिझी लाइफमध्ये सोशल नेटवìकग साइट्सनी कमालीचं महत्त्वाचं स्थान पटकावलंय. त्यातही आपल्यासारख्या यंगस्टर्सच्या हाती ही टेक्नॉलॉजी आल्यावर ‘खुल जा सिम सिम’ म्हणायचा अवकाश, साऱ्या सोशल साइट्स आपापल्या अलिबाबाची गुहा आपल्यासाठी उघडायला अतिशय तत्पर नि तय्यारीत असतात. त्या खंडीभर सोशल साइट्सवर काय बघावं नि काय वाचावं असं होऊन जातं. प्रत्येकाची आवडनिवड अर्थातच वेगवेगळी असते. तरीही यंगस्टर्सच्या आवडीचा लसावि काढून आम्ही इथं ‘सोशल नेटवìकग ट्रेिण्डग’चा ट्रेण्ड तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुम्हीही तुमच्या आवडीच्या पोस्ट किंवा व्हिडीओज शेअर करा. viva.loksatta@gmail.com वर ईमेल करताना सब्जेक्ट लाइनमध्ये ‘सोशल न्यूज डायजेस्ट’ असं नक्की लिहा.