माणसांपेक्षाही काही जणांना आपले पाळीव प्राणी जवळचे मित्र वाटतात. प्राण्यांसोबतच्या मत्रीची उदाहरणं अगदी आपल्याला इतिहासातदेखील आढळतात. प्राणिमात्रांशी सख्य सांगणाऱ्या अशाच काही ‘स्पेशल मत्री’बद्दलच्या गप्पा..मित्र.. फ्रेंड.. एक असं हक्काचं माणूस जो शांतपणे आपलं सगळं ऐकून घेतो आणि आपल्याला समजून घेऊन वेळप्रसंगी प्रेमळ सल्लाही देतो, पण हल्ली सर्व जण दिवसभर सतत कशात न कशात बिझी असतात आणि मग फ्रेंड्सना भेटणं, त्यांच्यासोबत वेळ घालवणं हे सगळे प्लॅन्स वीकएंडपुरतेच मर्यादित राहतात. आपल्याला माणसांपेक्षा आपलं काम, मोबाइल वगरे वगरे गोष्टी जास्त प्रिय झाल्यात, अशी ओरड समस्त पालकवर्ग कायम करत असतो; परंतु आपले काही मित्र असेही आहेत ज्यांना खरोखरच माणसांपेक्षाही कोणती वस्तू नाही तर प्राणी जवळचे वाटतात. हो! आपण पेट्सबद्दलच बोलतोय. प्राण्यांसोबत असलेल्या मत्रीची उदाहरणं अगदी आपल्याला इतिहासातदेखील आढळतात. महाराणा प्रताप आणि त्यांचा चेतक घोडा किंवा मग शिवाजी महाराज आणि त्यांचा कृष्णा घोडा! प्राणिमात्रांशी सख्य सांगणाऱ्या अशाच काही ‘स्पेशल मत्री’बद्दलच्या गप्पा.एरव्ही झुरळालाही पटकन घाबरतात असं मुलींबाबत म्हटलं जात असलं तरी प्राणी पाळण्यात मुलीच आघाडीवर आहेत, हेही तितकंच खरं आहे. सुरुवातीला घरात कुत्रा आणल्यावर तनुजाही अशीच काहीशी घाबरली, परंतु त्यानंतर हळूहळू भीतीची जागा प्रेमाने घेतली आणि आता तो तिचा बेस्ट फ्रेंड झालाय. ‘‘मी चौथीत असल्यापासून हॅमर आमच्यासोबत राहतोय. मी दहावीला असताना टय़ूशनला जायचे आणि टय़ूशनची वेळ झाली तरी मी झोपून असले की, तो मला त्रास देऊन जागं करायचा. नंतर शिक्षणासाठी मी पुण्यात आले तेव्हाही मी घरून पुण्याला यायला निघाले की, तो माझ्यावर रुसून बसायचा. तो घरभर सतत माझ्यामागे फिरत असतो. एस्पेशिअली मी अपसेट असले की, मला चीअर अप करण्यासाठी गमती करतो. हॅमरला आम्ही सगळीकडे आमच्यासोबत घेऊन फिरतो. त्यामुळे या फ्रेंडशिप डेला हॅमरसाठी म्हणजेच त्याला कम्फर्टेबली घेऊन फिरण्यासाठी इनोव्हा गाडी घेतोय.’’‘‘कधी तरी कोणत्या तरी कारणांनी आपण मित्र-मत्रिणींकडून हर्ट होतो आणि मग पुन्हा सगळ नीट झालं तरी ती सल कुठे तरी मनात राहतेच, परंतु प्राण्यांचं तसं नसतं. ते सगळं विसरून पुन्हा तितक्याच प्रेमाने आपल्या जवळ येतात. अशा प्रकारचं ‘अनकन्डिशनल लव्ह’ फक्त प्राणीच करू शकतात म्हणूनच माझी सिल्वा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे.’’ गायिका अनघा ढोमसे सांगते. ‘‘खरं तर माझ्या छोटय़ा भावाने मला आवडत नसताना सिल्वाला घरी आणलं आणि आता ती इतकी जवळची झालीये की, मला टेन्शन आलं किंवा मग माझी चिडचिड होतीये हे इतर कोणापेक्षाही तिच्या आधी लक्षात येतं आणि मग ती प्रेमाने मला बिलगून गोष्टी ठीक होतील असा विश्वास देते. तसंच मी गाण्याचा रियाज करत असते तेव्हा ती शांतपणे माझ्याजवळ किंवा तानपुऱ्याजवळ बसून माझं गाणं एन्जॉय करते. ते मला खूप भावतं. कार्यक्रम-रेकॉìडग-मीटिंग या सगळ्यात मी इतर दिवशी बिझी असते किंवा मग इतर लोकांना कमिटेड असते. त्यामुळे या फ्रेन्डशिप डेनिमित्त मला तिला वेळ द्यायचा आहे. दिवसभर मी आणि सिल्वा खूप धमाल करू.’’पाळीव प्राण्यांसाठी त्यांचा मालक म्हणजे त्यांचं जग असत आणि आपल्या बिझी लाइफमधलं ‘रिकामपण’ दूर करण्याची ताकद त्यांच्या प्रेमात असते. अशाच प्राण्यांना प्रेमाचं घर मिळवून द्यायचं काम एका संस्थेतर्फे - ‘पेट एनजीओ’च्या माध्यमातून तन्मयी गोखले करते. तिच्या स्वत:कडे एक बोका आहे. तिच्या आणि जॅक्सनच्या मत्रीबद्दल तन्मयी म्हणते, ‘‘मला मांजरी प्रचंड आवडतात, परंतु जॅक्सन हा माझा एकमेव सगळ्यात आवडता बोका आहे. त्याला माझ्या घरातून जायच्या-यायच्या वेळा बरोबर माहिती होत्या. तो कायम दारात माझ्या स्वागतासाठी तयार असतो. सुरुवातीला तो रोज आमच्या दारात त्याने मारलेला उंदीर आणून ठेवायचा. त्यामुळे घरातले जाम वैतागायचे, पण माझ्या अॅनिमल लव्हर फ्रेंड्सना विचारल्यानंतर समजलं की, ही त्याची ‘थँक्सगििव्हग’ची पद्धत आहे. मला बरं वाटत नसलं किंवा मग मी डाऊन असले की, तो माझ्या जवळपास घुटमळत राहतो. त्याला बागेतली माती उकरायला खूप आवडतं आणि एरवी मी त्याला त्यासाठी ओरडते, पण फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने मी त्याला मनसोक्त मस्ती करून देईन.’’प्राण्यांशी असलेल्या मैत्रीच्या नात्याविषयी सांगताना रुईया महाविद्यलयात तत्वज्ञान आणि मानसशास्त्र हे विषय शिकवणाऱ्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका हिमानी चौकर म्हणाल्या, ‘कुत्रे खूप चांगले, इमानदार असतात. मात्र, मांजरांमध्ये स्वार्थी वृत्ती असते असा लोकांचा समज असतो. मला मात्र असं अजिबात वाटत नाही. बऱ्याचदा माजारांना खायला मिळालं की, त्यांना बाकी काही नको असतं असं लोकांना वाटत. त्यात थोडय़ाफार प्रमाणात तथ्य आहे. मांजरांच्या मैत्रीची सुरुवात जरी खाण्यामुळे झाली तरी मांजरही छान मैत्र निभावतं. माझ्या मांजरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांची माझ्याशी असलेली मैत्री अत्यंत निव्र्याज आहे. माणसांशी असलेल्या मैत्रीत आपल्या मित्र मैत्रिणींकडून आपण कळत—नकळतपणे भावनिक आधाराची अपेक्षा करतो. इथे मात्र कुठल्याही अपेक्षेशिवाय माझी मांजरं माझ्यावर प्रेम करतात. त्यांच्या जवळ असताना मला खूप छान वाटतं. त्यांच्यामुळे माझं आयुष्य समृद्ध झालंय.’ थोडक्यात, माणसं काय किंवा प्राणी काय, मनापासून मैत्रीचं नात जपलं तर ते प्रेमाने निभवताही येतं हेच खरं.!!संकलन साहाय्य : लीना दातार