vv17प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलीवूडची स्टाइल दिवा म्हणून ओळखली जाणारी मलाइका अरोरा खान देतेय स्टाइल टिप्स खास व्हिवाच्या वाचकांसाठी.

मी, रवीना, मी २५ वर्षांची असून, माझी उंची ५ फूट ३ इंच आणि वजन ६२ किलो आहे. मी नेहमी डेनिमचे कपडेच घालते, पण माझी स्कर्ट्स घालून पाहायची इच्छा आहे. त्याबद्दल, आपण काही टिप्स देऊ शकाल का?

हाय,
रवीना, तू नेहमी डेनिमचे कपडे घालतेस, असं लिहिलं आहेस. पण या प्रचंड गर्मीच्या मोसमात, जाड डेनिमऐवजी तुला तुझ्या नेहमीच्या स्टायलिंगमध्ये काही तरी बदल करावासा वाटतोय, इट्स गुड. सध्याच्या गरमीच्या मौसमात, स्कर्ट्स हा एक बेस्ट ऑप्शन होऊ शकेल. तुझा बांधा उंच आहे, तेव्हा तुला थोडे शॉर्ट स्कर्ट घालून चालतील का? स्कर्टच्या लांबीबद्दल काही अडचण नसेल तर तू स्केटर स्कर्ट्स नक्की ट्राय करू शकतेस. (या प्रकारात स्कर्टची लांबी गुडघ्यांच्या थोडी वर असते. कमरेला घट्ट आणि खाली घेर असतो.) हा ड्रेस प्रकार तू घातलास, की खूप क्यूट दिसशील तू. या स्कर्ट्सवर दिवसा नेहमीचा साधा टी-शर्ट आणि संध्याकाळी याच स्कर्टवर ब्लाऊजवजा शर्ट घालता येईल. नाही तर, हाच ड्रेस प्रकार तुला ऑफिससाठी वापरायचा असेल तर या स्केटर स्कर्टवर पूर्ण पांढरा शर्ट, ऑफिस मीटिंग्ज ना, अगदी योग्य किंवा मैत्रिणींबरोबर डीनर पार्टीलाही जाताना छान दिसेल.
स्कर्ट्सचा आणखी एक प्रकार तुझ्यासाठी योग्य आहे, तो म्हणजे मॅक्सी स्कर्ट, या प्रकारात स्कर्ट्स लांब आणि घोळदार असतात, स्कर्टच्या कापडाला सुंदर फॉल असतो. मुख्य म्हणजे स्केटर स्कर्टची लांबी कमी असते, त्यामुळे जर तुला थोडं ऑड वाटत असेल तर मॅक्सी स्कर्टचा पर्यायही चालू शकेल. आता या प्रकारच्या स्कर्ट्सवर क्रॉॅप टॉप्स मस्त सूट करतील, आणि तुला ग्रेट युथफुल लुक देतील. (क्रॉॅप टॉप्स – आखूड उंचीचे असतात, पूर्वी ‘पोटीमा’ फॅशन होती तसेच. फक्त बऱ्याच वेळा या क्रॉॅप टॉप्सची बॉटम लाइन खूप मजेशीर असते, कधी फ्रील, कधी कर्ल्स यात तुला अगदी फॅन्सी पण गर्ली लुक मिळेल. यात वेगवेगळ्या आकार प्रकारचे क्रॉॅप टॉप्सही उपलब्ध असतात.). एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे या स्कर्ट प्रकारात हाय हिल्सच्या सॅण्डल्स नक्की घाल, त्यामुळे तू छान उंच दिसशील.
आता स्कर्ट्सच्या रंगांबद्दल विचारशील तर काळ्या रंगाचा मॅक्सी स्कर्ट, खूपच क्लासी लुक देऊन जातो. कौटुंबिक पार्टीज, डीनर पार्टीजसाठी तो बेस्ट कलर ऑप्शन. आता यावर अ‍ॅक्सेसरीज हव्यातच, एखादा ठळक नेकलेस घातलास की यू आर रेडी टू गो. सो रवीना, या उन्हाळ्यात ट्राय स्कर्ट्स, बी कुल. गुड बाय.

आपल्या गर्ल्स गँगबरोबर सकाळी ब्रंचला जाणार आहात की रात्री पार्टीचा प्लॅन आहे? काय घालू, कसं दिसेल या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी स्टाइल दिवा मलाइका अरोरा-खान तुम्हाला मदत करेल. फॅशन, कपडे, हेअर, स्टाइलिंग याबाबतच्या तुमच्या शंकांना मलाइका या सदरामधून उत्तरं देईल. फॅशन आणि स्टाइलिंगविषयीचे आपले कोणतेही प्रश्न ५्र५ं@ी७स्र्१ी२२्रल्ल्िरं.ूे या इमेल आयडीवर बिनधास्त पाठवा. आपलं नाव, राहण्याचं ठिकाण यांसह प्रश्न पाठवा आणि सब्जेक्ट लाइनमध्ये स्टाइलिंग बाय मलाइका असं आवर्जून लिहा.
मलाइका अरोरा खान
(अनुवाद : गीता सोनी) सौजन्य – द लेबल कॉर्प
http://www.thelabelcorp.com, http://www.theclosetlabel.com