हवेतला गारवा पेटत्या होळीसरशी गायब झाला आणि बाजारातलं थंडीसाठी आलेलं कलेक्शनदेखील.    v35    दुकानांमध्ये आता खास समरमध्ये वापरण्यासाठीचं कलेक्शन दिसायला लागलं आहे. लूज टीशर्ट्स, टॉप्स मिळतायत, खास कॉटन स्कार्फ, स्कूटर्स बाईक्स वापरणाऱ्यांसाठी फुल हातांचे टीशर्ट्स, जरा युनिक हटके ओव्हरकोट्ससुद्धा मिळू लागलेत. उन्हाळ्यासाठी कलर्स आणि कापड याचं ‘करेक्ट कॉम्बो’ बघायला मिळतंय.
मुंबईतली स्ट्रीट शॉपिंगची प्रसिद्ध ठिकाणं- कुलाबा, बांद्रा, लिंकिंग रोड आदी ठिकाणी तर नवं कलेक्शन सध्या पाहायला मिळतंय. अर्थातच कॉटनचा यात जास्त वापर आहे. स्कर्टचे अनेक प्रकार दिसताहेत. कॉटन रॅपअराऊंड स्कर्ट्स, शॉर्ट स्कर्ट्स, डेनिम स्कर्ट्स याचं बाजारात वर्चस्व बघायला मिळतंय. शॉर्ट्समध्ये डेनिमबरोबरच होजिअरी शॉर्ट्सही आल्या आहेत.
लहान मुलांमध्ये फेमस असलेली डंगरी आता मोठय़ांसाठीही मिळू लागली आहे. मुलींसाठी डंगरीजचं कलेक्शन जास्त आहे. तसंच फुल आणि हाफ जम्पसूटससुद्धा अ‍ॅव्हेलेबल आहेत.
अ‍ॅक्सेसरीजमध्ये उन्हाळ्यात मस्ट असणारा गॉगल अनेक स्टॉल्सवर बघायला मिळतोय. विविध प्रकारचे फायबर फ्रेमचे गॉगल्स यंदा जास्त आहेत. अगदी १०० रुपयांपासून ते ५००-७०० रुपयांपर्यंतच्या रेंजमध्ये हे या रस्त्यावरच्या दुकानांमध्ये मिळतात. अ‍ॅक्सेसरीजमध्ये नाजूक डिझाइन्सचे नेक पिसेस आणि इअररिंग नव्याने आलेली दिसताहेत.
स्ट्रीट शॉपिंगमध्ये समर दिसायला लागण्याआधीच मॉल्समध्ये नवं कलेक्शन दाखल झालंय. थोडे पैसे जास्त द्यायची तयारी असेल तर तुमचा समर ‘कूल’ करण्यासाठी मॉल्समध्ये भरपूर व्हरायटी आणि परफेक्ट फिटचे कपडे मिळू शकतील. पार्टी वेअर, कॅज्युअल्स आणि फॉर्मल सगळ्याच कलेक्शनमध्ये नवी डिझाइन्स इथे दिसताहेत. कॅज्युअल्समध्ये क्रॉप टॉप्सची चलती आहे. v37याशिवाय नेहमीचे शर्ट्स, टीशर्ट्स, कुर्ती आहेतच. गेल्या सीझनची पलाझो पँटही अजून आहे. शिवाय हॉट पँट्स, कॉटन पँट्सही आहेत. त्यावर घालायला ‘ऑफ शोल्डर’ टॉप्स नव्याने दिसताहेत. उन्हाळ्याच्या निमित्ताने फूटवेअरचेसुद्धा नवे कलेक्शन दिसते आहे. यामध्ये फ्लिप-फ्लॉप्स, सँड्ल्स, स्लीप-ऑन्स, ओपन टो अशी मोकळी डिझाइन्स जास्त आहेत. v38पार्टी वेअरसाठी सुटसुटीत कॉटनचे वन पीस, स्कर्ट परफेक्ट वाटतील. टॉप्स, टीशर्ट्स, कुर्तीज बरोबर जॅकेट्स ट्राय करून एक चांगला लुक तुम्ही मिळवू शकाल. क्रॉप टॉप आणि पलाझो पँट, तसंच लूज शर्ट आणि डेनिम स्कर्ट अशी वेगवेगळी कॉम्बिनेशन्स तुमचा समर स्टाइलिश बनवू शकतील. हॅपी शॉपिंग!