vv27बराचसा उन्हाळा सरला असला, तरी आता राहिलेले दिवस आणखी तापदायक ठरणार आहेत. कारण आता हळूहळू ढग जमायला सुरुवात होतेय आणि त्यामुळे घाम येण्याचं प्रमाण वाढतंय. काहिली वाढतेय. उन्हाळ्यावर मात करण्यासाठी शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राखणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. जगण्यासाठी तुमचे शरीर पाण्यावर अवलंबून असते. आपल्या शरीराच्या वजनाच्या अध्र्याहून अधिक वजन पाण्याचे असते, प्रत्येक अवयवाला कार्यक्षम राहण्यासाठी पाण्याची गरज असते. तहान लागणे, वात येणे किंवा डोकेदुखी यासारखी डिहायड्रेशनची लक्षणे दिसण्याची वाट न पाहता तातडीने पावले उचला.

डिहायड्रेशन म्हणजे काय ?
प्यायलेल्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा शरीरातून अधिक पाणी गमावणे या अवस्थेला निर्जलीकरण किंवा डिहायड्रेशन असे संबोधण्यात येते. लघवी, मल, घाम तसेच उच्छवासावाटेही रोज शरीरातून पाण्याचा निचरा होत असतो. पाण्याबरोबरच शरीर काही प्रमाणात क्षारही गमावते. शरीरातून पाणी गमावणे ही सामान्य प्रक्रिया आहे. परंतु, जर हे प्रमाण वाढले तर डिहायड्रेशनचा त्रास होतो.
उकाड्यावर मात करण्याचे मार्ग…
तहान लागण्याची वाट पाहू नका ज्यावेळी तुमचे तोंड कोरडे होते, त्यावेळी तुमच्या शरीरात निर्जलीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे असे समजावे. लघवीचा रंगही आपण किती प्रमाणात पाणी प्यावे हे सांगणारा निदर्शक आहे. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास लघवीचा रंग फिकट किंवा रंगहीन दिसतो.
किती पाणी प्यावं?: शरीराच्या पाण्याची गरज तुमच्या वजनावर अवलंबून असते. जर तुमचे वजन ६० किग्रॅ असेल तर तुम्हाला दर दिवशी दोन लीटर पाणी पिणे गरजेचे आहे. जर तुम्ही उन्हात जाणार असाल किंवा व्यायाम करणार असाल तर तुम्हाला अधिक पाण्याची गरज भासू शकते.
पाणी पिण्याची सवय लावून घ्या पाणी पिण्याची सवय लागली पाहिजे. पाण्याची बाटली सदैव तुमच्या जवळ बाळगा. साधे पाणी शरीरात पटकन शोषले जाते, त्यामुळे त्याचे अधिकाधिक सेवन करा.
पाण्याचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ खा तुमच्या पाण्याची गरज भागविण्याची आणि पाण्याचे प्रमाण राखण्याचा हा चांगला मार्ग आहे. किलगड, खरबूज यासारखी फळे खा. िलबू, संत्रे आदी िलबुवर्गीय फळे केवळ शरीराला पाणी पुरवत नाही तर इलेक्ट्रोलाइटचाही पूरवठा करतात.
काकडी आणि टोमॅटो खा यात वजनाच्या ९० टक्क्यांहून अधिक प्रमाणात पाणी असते. उन्हाळ्यात आपल्याला जास्त घाम येतो आणि त्यावाटे आपण शरीरासाठी महत्त्वाची असलेली खनिजेही गमावतो. काकडीच्या माध्यमातून पोटॅशिअमचा पूरवठा शरीराला होतो तर अस्कॉर्बकि असिड आणि कॅफिक असिड यांच्या पाणी धरुन ठेवण्याच्या क्षमतेमुळे शरीराला त्याचा लाभ होतो.
कॉफीला टाळून ग्रीन टी कडे वळा कॅफिनचा समावेश असलेल्या चहा, कॉफी, कोलास आणि चॉकलेट उन्हाळ्यात टाळा. हे पदार्थ लघवीची अधिकाधिक निर्मितीला चालना देते.
शहाळ्याच्या पाण्याची जादू अनुभवा नारळ पाणी आपल्या शरीराला योग्य प्रमाणत पाणी पूरवते कारण त्यात मानवी पेशी आणि प्लाझ्माला आवश्यक इतके इलेक्ट्रोलाइट्सही पुरवते.
मसालेदार पदार्थ टाळा शरीराचे अंतर्गत तापमान वाढवून पाण्याचा निचरा अधिक होण्यास मसालेदार पदार्थ कारणीभूत असतात.
जेव्हा तुम्ही घराबाहेर काही कामासाठी बाहेर पडण्याचे ठरवाल. तेव्हा काम सुरू करण्याआधी दर १- २ तासाला दोन ग्लास पाणी प्या ज्यामुळे तुम्ही कामाला लागण्याआधी तुमच्या शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण असेल. जेवणाआधी एक ग्लास पाणी प्या. घरात काम करतानाही पाण्याची बाटली जवळ बाळगा.
पारंपरिक पेय
लस्सी उन्हाळ्यातील हे पेय शरीरातील चांगल्या सूक्ष्मजंतूच्या वाढीला चालना देते, शरीराचे तापमान कमी करते आणि पचनक्रियाही सहज करते. जेवणानंतर दिवसातून दोनदा हे पिऊ शकता.
नारळ पाणी रुचकर आणि ताजेतवाने करणारे पेय. दिवसातून कधीही पिऊ शकता.
लेमोनेड किंवा लिंबू पाण्यामुळे तत्काळ तरतरी येते आणि रुचकर असे पेय शरीराचे तापमानही कमी करते. लिंबू पाणी एक आरोग्यदायी पेय असून ते सकाळी प्यायले जाते.
कैरी पन्हे आंबट चवीचे हे पेय उन्हाळ्यासाठी उत्तम पेय असून त्यामाध्यमातून शरीराला जीवनसत्त्वे आणि खनिजेही मिळतात. पन्हे भरलेली एक थंडगार मोठी बाटली घेऊन समुद्रकिनारी जा किंवा जोरदार व्यायाम केल्यानंतर त्याची मजा लुटा.
सोल कढी चांगल्या सूक्ष्मजंतूंची वाढ करणारे हे पेयही उन्हाळ्यासाठी उत्तम आहे. हे पेय जेवणाबरोबर घेतले जाते.
(लेखिका सर्टिफाइड न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशिअन आहेत.)
संजना मोटवानी

temperature drop in mumbai
तापमानात घट; मात्र आर्द्रतेमुळे उष्मा कायम
maintaining weight will be a challenge for next four months says vinesh phogat
आता वजन राखण्याचे आव्हान – विनेश फोगट
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Drain cleaning mumbai
नालेसफाईला सुरुवात, आतापर्यंत १५ टक्के गाळ काढला