vv12सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडिओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट
अ‍ॅण्ड ऑस्कर गोज टू..
जागतिक चित्रपटविश्वात सर्वाधिक मानाचा समजला जाणारा ‘ऑस्कर’पुरस्कार सोहळा लॉस एन्जल्समधील डॉल्बी थिएटरमध्ये गेल्या रविवारी झाला. आठवडय़ाच्या सुरुवातीला सगळ्या नेटवर्किंग साइट्सवर ‘ऑस्कर १५’चाच ट्रेण्ड दिसत होता. ८७ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट चित्रपटांतली चुरस, आपापल्या आवडीच्या कलावंतासाठी केलेली प्रार्थना आणि बांधलेल्या आडाख्यांचं काय होईल, याची उत्सुकता या सोहळ्यादरम्यान अनेकांना लागली होती. सर्वोत्कृष्ट चित्रपट बर्डमॅन, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आलियांद्रो जी. इनारितो (बर्डमॅन), सर्वोत्कृष्ट अभिनेता- एडी रेडमाइन (द थिअरी ऑफ एव्हरीिथग), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- ज्युलियन मूर (स्टिल अ‍ॅलिस), परदेशी भाषांतील सर्वोत्कृष्ट चित्रपट- इडा (पोलंड), सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री- पॅट्रिशिया अ‍ॅराक्वेट (बॉयहूड), सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता- जे. के. सिमन्सन, सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म- क्राइसिस हॉटलाइन यांसह विविध विभागांतील पुरस्कार वितरित करण्यात आले. ‘ऑस्कर15’ या हॅशटॅगसह एडी रेडमाइन, ज्युलियन मूर, पॅट्रिशिया, सिमन्सन आदींचा ट्रेण्ड ट्विटरवर सर्वाधिक होता. ऑस्करला परफॉर्म करणाऱ्या लेडी गागा चं नावंच जास्त वेळा ट्विट केलं गेलं. शिवाय ‘ऑस्कर15’ हा ट्रेण्ड ‘फेसबुक’सह अन्य माध्यमांतही वरचढ ठरला.  
ट्विटरवर जगभरातून ऑस्करसंबंधी अपडेट्स उमटत होते. त्यामध्ये भारतीय सेलेब्रिटीही मागे नव्हते. अमिताभ बच्चन, परिणिती चोप्रा, आलिया भट्ट यांनी ऑस्करविषयक अपडेट्स ट्विटरवरून दिले.
मौका मौका.. मिल गया..
vv13वर्ल्डकपमध्ये भारतानं आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेवर एकदाही विजय मिळवला नव्हता. पण ‘इतिहास के पन्नों पर नया कुछ लिखाया जा सकता हैं,’ हाच ठाम विश्वास टीम इंडियानं या सामन्यात दाखवून दिला. त्यामुळं Ind vs SA, SA vs IND ‘मौका मौका’ या हॅशटॅगसह धावांचं ‘शिखर’ गाठणाऱ्या धवनविषयी सर्वाधिक ट्रेिण्डग नसतं, तरच नवल. पाठोपाठ ‘स्टेन’, ‘आमला’, ‘डी कॉक’ हे हॅशटॅग ट्विटरवर दिसून आले. वर्ल्डकपचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर असणाऱ्या सचिन तेंडुलकरची प्रेक्षक म्हणून हजेरी नि त्यानं काढलेली सेल्फीही गाजली. देशभरातून टीम इंडियावर शुभेच्छांचा पाऊस पडला. त्यातही ‘शिखर, चक्की का अ‍ॅड्रेस दे दो भाई!’ ‘विराट, शिखर, अजिंक्य धन्यवाद!’ या आमीरखानच्या ट्विटनं जणू समस्त क्रिकेटप्रेमींच्या vv14प्रातिनिधिक भावनाच व्यक्त केल्या. ट्विटरवर ##poonampandeykobulao हा ट्रेंड होता. पूनमनं ट्विट केल्यावर त्यावर अनेक उलटसुलट चर्चा होऊन या ट्विट्सवर बराचसा नाराजीचा सूर ट्विटरकरांमध्ये दिसला. त्याखेरीज ‘आता ही अफवा कोणी पसरवली की हाशीम आमलाच्या वडिलांचं नाव डाबर आमला आहे’ किंवा ‘इसी बीच आलिया भट्टने डेव्हिड धवन को उनके बडे बेटे शिखर धवन के शतक मारने पर बधाई दी। यह सुनकर डेव्हिड धवन फोन परही बेहोश हो गए।’ असे मेसेजेसही फॉरवर्ड केले जात होते आणि वर्ल्ड कपच्या फिक्स्ड विनर्सची लिस्टही..
चिमुरडय़ांसाठी ‘गुगल’चं ‘यू टय़ूब’ अ‍ॅप
‘गुगल’नं चिमुरडय़ांसाठी खास ‘यू टय़ूब’ अ‍ॅप तयार केलंय. हे अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल नि टॅब्लेटवर उपलब्ध होतंय. या ‘यू टय़ूब किड्स अ‍ॅप’च्या माध्यमातून मुलांच्या हाती चांगली माहिती लागावी, हा उद्देश आहे. १२ वर्षांखालील मुलांसाठीच्या या अ‍ॅपमध्ये विविध टय़ून्स व्हिडीओ, किड्स टीव्ही शो, लहान मुलांसाठीची विविध प्रकारची माहिती उपलब्ध होईल. या अ‍ॅपला किड-फ्रेण्डली डिझाइन दिलं गेलंय. अ‍ॅपमधील आयकॉन मोठे आहेत. मात्र स्क्रोिलग फार असणार नाही. या अ‍ॅपमध्ये टायमरच्या सोयीमुळं पालकांना आपल्या मुलानं किती वेळ अ‍ॅप वापरायचा ठरवता येईल.
‘ट्विटर’वरचे हिंदी हॅशटॅग नि सेलेब्ज मिडल नेम
  vv15‘ट्विटर’नं लोकल युजरना भुरळ घालण्यासाठी हिंदीत ‘हॅशटॅग’ची सुविधा दिली आहे. वर्ल्ड कपच्या निमित्तानं भारत-पाकिस्तानच्या सामन्याच्या वेळी ट्विटरवर पहिल्यांदाच ‘जयिहद’ हा देवनागरीतील हॅशटॅग अनेकांनी वापरल्यानं तो ट्रेण्ड ठरला होता. त्यापाठोपाठ महाशिवरात्रीच्या निमित्तानं ‘हर हर महादेव’ हाही भारतातील टॉप ट्रेंड होता. ‘सेलेब्ज मिडल नेम’ हाही एक ट्रेण्ड होता. यात सेलेब्रेटीजचं मिडल नेम ट्विट करायचं होतं. ‘अण्णा अनशन हजारे’ असं चेतन भगतनं ट्विट केलं होतं, तर आलिया बेबीफेस भट, श्रेया गॉर्जेस घोषाल, दीपिका परफेक्ट पदुकोण अशी नवी मिडल नेम समोर येत होती. बिग पी, प्रियांका, दीपिका, आलिया आदींच्या नावावर सर्वाधिक कोटय़ा करण्यात आल्या होत्या.
श्रद्धांजली नि निषेधही
vv16कॉम्रेड गोिवद पानसरे यांना सोशल मीडियावरून नेटकरांनी श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजलीपर अनेक पोस्ट, ट्विटस् लिहिल्या गेल्या. काहींनी आपले डीपी, वॉलपेपर्स काळे ठेवून कॉम्रेड पानसरे यांच्यावरील ह्ल्ल्याचा निषेध केला. आम्ही सारे पानसरे अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.  
ट्विंकल ट्विंकल
हिरॉइन टि्वकल खन्नाचं या आठवडाभरात ‘ट्विटर’वर ट्रेंिडग होतं. ट्विंकलनं ब्लॉगच्या माध्यमातून विविध मुद्दय़ांवर सडेतोड भूमिका घेतलेय. तिनं ‘एआयबी रोस्ट’चं समर्थन केलं असून मुंबईला बॉम्बेच म्हणणार, असा निर्धारही व्यक्त केलाय. त्यावरही उलटसुलट चर्चा नेटकरांमध्ये रंगली होती.
राधिका कुंटे