vv19गुलाबी थंडी नि एक्स्टेंडेड वीकएण्डमुळं गेल्या आठवडय़ापासून नेटिझन्स भलतेच खूश दिसताहेत. फिरस्तीचे फोटो धडाधड अपलोड होताहेत. सोशल मीडियावरच्या अ‍ॅक्टिव्हिटीही वाढल्या आहेत. म्हणून या वेळचे ट्रेण्ड्स थोडे रिलॅक्सिंग मूडमधले आहेत.नेस समोर आणत आहे.
ओबामा फिव्हर
 vn09  भारतीय प्रजासत्ताक सोहळ्याचे पाहुणे म्हणून आलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारतभेटीचा भरपूर गाजावाजा सगळ्याच माध्यमांमध्ये झाला. मग त्यात सोशल मिडिया तरी कसा मागं राहिल. ट्विटर, फेसबुक, यूट्यूब, व्हॉटस् अँप आदींवर ओबामांच्या गाडीपासून ते मिशेलना भेट दिलेल्या साडीपर्यंत, व्हाईट हाऊसच्या ट्विटर टीमकडून जय हिंदचं ट्विट करण्यापासून ते ओबामांच्या च्युइंग गम चघळ्यापर्यंत आणि अर्थातच विविध मुद्दय़ांवर भारत-अमेरिकेच्या चर्चा.. ओबामांच्या दौऱ्याचे क्षणाक्षणाचे अपडेटसवर तितक्याच क्षणार्धात व्यक्त होणारे नेटिझिन्स असं चित्र या काळात दिसलं. आणि हो, राजपथावरच्या ‘परेड‘ला ‘यू ट्यूब‘वर एका दिवसात १,०४०,००६ व्ह्यूज मिळाले.

डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षीचा ट्रेलर

आतापर्यंत व्योमकेश बक्षीच्या पुस्तकी डिटेक्टिव्हगिरीला दाद देणाऱ्यांसाठी एक खूशखबर. ‘डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी’ हा चित्रपट एप्रिलमध्ये प्रदर्शित होतोय. दिवाकर बॅनर्जीनं डिरेक्ट केलेल्या या चित्रपटात चाळीसच्या दशकातील कोलकाता शहरामधला कालपट उलगडणारेय. सुशांतसिंग राजपूत व्योमकेशच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या यू टय़ूबवरील ट्रेलरला एका दिवसात २,८९, ८३२ व्ह्य़ूज मिळालेत.  
https://www.youtube.com/watch?v=ZG–GOpi_0g

व्हॉट्सअ‍ॅप आता कॉम्प्युटरवर
‘व्हॉट्सअ‍ॅप’ या सध्याच्या सर्वाधिक लोकप्रिय मोबाइल अ‍ॅपचं वेब ब्राऊझर व्हर्जनही आलंय, हे फेसबुकवर टॉप ट्रेण्डिंग आहे. त्यामुळं नेटकरांना व्हॉट्सअ‍ॅपचा वापर आपल्या लॅपटॉप नि डेस्कटॉपवरून करता येणारेय. हे अ‍ॅप लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर सुरू करण्यासाठी क्रोम ब्राऊझरमधून https://web.whatsapp.com वर जावं लागेल. तिथं गेल्यावर दिसणारा क्यूआर कोड आपल्या मोबाइलवरील व्हॉट्सअ‍ॅपच्या साहाय्यानं स्कॅॅन केल्यावर तुम्हाला या ब्राऊझमधूनही व्हॉट्सअ‍ॅप वापरता येईल. यासाठी सर्वात आधी व्हॉट्सअ‍ॅपचं अपडेटेड व्हर्जन तुमच्या मोबाइलवर असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर इंटरनेटही सुरू असावं. ही सोय अ‍ॅण्ड्रॉइड, ब्लॅकबेरी आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमसाठी उपलब्ध आहे.  
रणबीर रिअली ऑनलाइन?
vn10आतापर्यंत सोशल मीडियापासून चार हात लांब राहिलेला प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर ‘सोशली अ‍ॅक्टिव्ह’ झालाय, अशी ब्रेकिंग न्यूज कम ट्रेण्डिंग आठवडय़ाभरापूर्वी होतं. ट्विटरवर तर हे ट्रेण्डिंग टॉप पोझिशनवर होतं. ट्विटर, एफबी, इन्स्टाग्राम, टम्बलर, स्नॅपचॅट, विन या साइट्सवर तो अ‍ॅक्टिव्ह होतोय, असं सांगितलं गेलं. मग काय, रणबीर फॅन्सच्या दिल की धडकन वाढली. मात्र तो खरंच अ‍ॅक्टिव्ह झालाय की, हे सारं लिनोव्हाच्या ए ६००फोनसाठी केलेलं प्रमोशन आहे, याबद्दल थोडी दुविधा निर्माण झाल्येय. काही फॅन्सनी त्याच्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं असलं तरीही काहींना हे लिनोव्हा प्रमोशन आहे, असा डाऊट आहे. कळेलच तेही लवकर..

ब्लाइंड कॉमेंट्री..

अभिनेता वरुण पृथ्वीचा एक व्हिडीओ सध्या नेटकरांमध्ये प्रचंड दाद मिळवतोय. त्यानं साधलेल्या संवादाचा हा व्हिडीओ आहे. इंग्रजी भाषेचा एबीसीडी माहीत नसणारी एक अंध व्यक्ती घडाघडा इंग्रजीतून रनिंग कॉमेंट्री करताना दिसतोय. कॉमेंट्री करताना त्यांचा तो इझिनेस, त्यात रमून जाणं नि ठासून भरलेला आत्मविश्वास.. यू टय़ूबवरील या व्हिडीओला एका दिवसात १०,६८२ व्ह्य़ूज मिळालेत. हा संवाद बघणाऱ्यालाच एक नवीन दृष्टी देऊन जातो. असे काही व्हिडीओज् आपल्याला देतात ती जगण्याची एक नवीन दिशा.. जी बघायलाच हवी..
https://www.youtube.com/watch?v=D0Q_

यू सेड इट
vn11प्रजासत्ताक सोहळ्याच्या रात्री बातमी आली ती सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्या निधनाची.. ‘यू सेड इट‘ नावानं त्यांनी फक्त व्यंगचित्र असलेलं एक सदर सुरू केलं होतं. लक्ष्मण यांनी देश-विदेशांतील थोरामोठ्यांची व्यंगचित्रं काढली असली तरी त्यांचा कॉमनमॅन विशेष गाजला. घटनांचे अचूक टिपण, उत्तम निरीक्षण, बुद्धिमत्तेमुळं लक्ष्मण यांची व्यंगचित्रं लक्षात राहतात. ‘यू सेड इट‘ या सदराच्या शीर्षकावर ट्विट करत, त्यांच्या लाडक्या कॉमनमॅनसोबतचं त्यांचं कार्टून पोस्ट करून ट्विटरसह सगळ्याच माध्यमांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली गेली. ‘यू सेड इट’ सर..

एसआरके अँप्रिसिएशन डे

शाहरुख खानचे चाहते जगभरात पसरलेत. त्यांच्यापकी ‘एसआरके युनिव्‍‌र्हस‘ या ट्विटर ग्रुपनं 25 जानेवारी हा ‘एसआरके अँप्रिसिएशन डे‘ म्हणून सेलिब्रेट केला. सगळ्या चाहत्यांनी केलेल्या ट्विटसमुळं आणि या ग्रुपनं आयोजलेल्या क्वीझच्या विजेत्यांना गिफ्ट व्हाऊचर देण्यात येणार असल्यामुळं टॉप ट्रेिण्डगपकी बनला होता.
राधिका कुंटे -viva.loksatta@gmail.com