vv32सेलेब्रिटीज आणि त्यांची फॅशन हा जगभरातील तमाम फॅशनप्रेमींचा लाडका विषय. कोणाची फॅशन हिट ठरली आणि कोणाची फ्लॉप, यावर दर आठवडय़ाला एक नजर टाकूया या  व्हिवा सेलेब्रिटी फॅशन गॅलरीमधून..
‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’चे रेड कार्पेट आणि त्यावरील सेलेब्रिटीजची दिमाखदार फॅशन परेड हा दरवर्षी चर्चिला जाणारा विषय आहे. यंदाही कानच्या रेड कार्पेटवर अनेक तारकांनी त्यांच्या लुक्सनी लोकांना थक्क केले. यंदा सर्वाधिक चर्चा झाली ती सोनम कपूर, चायनीज अभिनेत्री फॅन बिंगबिंग आणि फ्रेंच अभिनेत्री लैला बेख्ती यांच्या लुक्सची. एकाच ब्रॅण्डच्या सदिच्छादूत म्हणून दरवर्षी कानला हजेरी लावणाऱ्या या तिघीही या महोत्सवामधील महत्त्वाच्या फॅशन आयकॉन समजल्या जातात.
सोनम कपूर
viva08
‘कान्स’साठी सोनमने राल्फा अ‍ॅण्ड रुसोचा निळा पेप्लम गाऊन घातला होता. याशिवाय अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या साडीतही ती दिसली. ‘कान्स’मधील तिच्या सगळ्या लुक्समध्ये तिने मिनिमल पण शार्प मेकअप आणि बोल्ड ज्वेलरी घालण्यास पसंती दिली होती. डीप नेक यंदा तिच्या लुकचा केंद्रबिंदू होता. यंदा तिची स्टाइल मागच्या कानवाऱ्यांच्या तुलनेत परिपक्व वाटत होती. पण तिची स्टाइल वाजवीपेक्षा जास्त बोल्ड होणार नाही, याकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचं लक्षात येत होतं.
फॅन बिंगबिंग
viva06
सोनमच्या तुलनेत फॅनचा लुक एलिगंट आणि एफर्टलेस होता. ‘कान्स’मध्ये ती नेहमीच चायनीज परंपरेचे प्रतिनिधित्व करताना दिसते. मार्चेसा गाऊन विथ फ्लोरल  डिटेल्समधून तिची चायनीज परंपरा स्पष्ट दिसत होती. एरवी रेड कार्पेटसाठी फिटेड गाऊन्सना पसंती देणाऱ्या अभिनेत्रींच्या तुलनेत तिचा हा ग्रे गाऊन उत्तम पर्याय होता. तिनेही मिनिमल मेकअप ठेवण्यास प्राधान्य दिले होते.
लैला बेख्ती
viva07
लैलाचा लुक या दोघींच्या तुलनेने खूपच सिम्पल पण दखल घ्यायला लावणारा होता. गुलाबी बॅले स्ट्रॅपलेस गाऊनसोबत मेसी बन आणि रेड लिपस्टिक इतक्या मिनिमल मेकअपने तिने आपला लुक पूर्ण केला होता. पण तिने आपल्या लुकने फॅशन समीक्षकांना दखल घेण्यास भाग पाडले.