‘व्हिवा लाउंज’मध्ये उपस्थित असणाऱ्यांचा  प्रीता सुखटणकरच्या रूपाने एका वेगळ्या क्षेत्राशी परिचय झाला. सेलिब्रिटी ब्रॅिण्डग, ई-कॉमर्स यातल्या संधी समजल्या. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे प्रीताची नावीन्यासाठीची धडपड अनेकांना भावली. नवनवीन क्षेत्रांत उतरण्याची तिची धडाडी प्रेरणादायी वाटली.

अपर्णा जगताप
एका वेगळ्या क्षेत्राबद्दल प्रीता यांच्याकडून समजलं. ई-कॉमर्स, सेलिब्रिटी ब्रॅिण्डग यामधील संधींबद्दलही नव्यानं कळलं. आवड आणि करिअर नेहमी वेगळे ठेवा, असे सगळे सांगतात पण आवड आणि करिअर यांची उत्तम सांगड घालता येते, याचं उत्तम उदाहरण प्रीता सुखटणकर आहे. गुणवत्ता असेल तर प्रसिद्धी आपोआप मिळते हे त्यांनी सिद्ध केलंय. एकूणच त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं.

श्वेता मोरे
एक व्यक्ती आणि तिची वेगवेगळ्या क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरी, तिचा अनुभव खूप काही शिकवून जातो. प्रीता यांच्या मार्गदर्शनामुळे ई-कॉमर्स या क्षेत्राबद्दलचे गरसमज दूर झाले. या क्षेत्रात कोणतीही फॅमिली बॅकग्राऊंड नसताना केवळ कौशल्य, मेहनत आणि जिद्द या जोरावर त्यांनी मिळवलेलं यश खूप प्रेरणादायी वाटलं. मॅनेजमेंट स्किल्सबद्दल मिळालेली माहिती नक्कीच मला उपयोगी पडेल.

मधुश्री प्रताप
सेलिब्रेटी ब्रॅण्डिंग म्हणजे नक्की काय ते आधी माहीत नव्हतं,पण प्रीतामुळे या नवीन विषयाची ओळख झाली. तिचा करिअरबद्दल आऊट ऑफ वे जाऊन केलेला विचार आवडला. तिच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. यशस्वी व्हायचं असेल तर रिस्क घ्यावीच लागते आणि हार्ड वर्कदेखील महत्त्वाचं आहे हे समजलं.

ईशा घैसास
व्हिवा लाउंजची आजची मुलाखत खूपच वेगळी होती. प्रीता यांची बोलण्याची पद्धत खूपच भावली. त्यांनी ज्या पद्धनीने स्वत:चं करिअर घडवलंय ते खरंच खूप ग्रेट आहे. आयुष्याकडे बघण्याचा प्रीताचा फ्री आणि फिअरलेस दृष्टिकोन मला खूपच भावला. तसा अ‍ॅप्रोच मी आत्मसात करण्याचा नक्की प्रयत्न करीन.

स्वाती भट
वेगळ्या विषयावर आणि अतिशय वेगळ्या क्षेत्रातले अनुभव ऐकायला मिळाले. ई-कॉमर्सबद्धल आजपर्यंत फक्त वाचलं होतं पण एक ई-कॉमर्सची कंपनी आणि तीसुद्धा एका मराठी स्त्रीची.. धिस इस ग्रेट! रिस्क टेकिंग स्किल प्रीताकडून खरंच शिकण्यासारखं आहे.

रेवती कुरुंदवाड
ई-कॉमर्स आणि सेलिब्रिटी ब्रॅण्डिंगसारख्या नवीन फिल्डविषयी चांगली माहिती समजली. प्रीताचं बोलणं ऐकून वेगळ्या करिअरच्या वाटेचा विचार करण्याचा कॉन्फिडन्स मिळाला. त्यांच्यामुळे खूप इन्स्पिरेशन मिळालं. प्रीताचे विचार क्लीअर आहेत आणि वृत्ती धडाडीची आहे, हे मला विशेष आवडलं.

स्नेहल देशमुख
जॉब पोर्टलवर बरेचदा सेलिब्रिटी मॅनेजर पाहिजे, अशी जाहिरात पाहिली होती. पण त्याचं खरं स्वरूप आता समजलं. मुख्य म्हणजे हे समजलं की, प्रवाहाच्या विरुद्ध पोहून स्वत:ला सिद्ध करायची जिद्द बाळगली आणि त्या जिद्दीला परिश्रमाची साथ दिली तर कामाला आणि पर्यायाने यशाला सीमा नाही.

भाग्यश्री देवरे
सेलिब्रिटी मॅनेजमेंटमध्ये नक्की काय काय येतं हे प्रीतामुळे समजलं. प्रीतासारखा धीटपणा सगळ्यांनीच आत्मसात केला तर अनेक नवीन क्षेत्रं तरुणाईपुढे खुली होतील. नवीन उद्योजक आणि त्यांनी नव्यानं पाडलेले पायंडे नक्की पाहायला मिळतील, असं आजची मुलाखत ऐकताना वाटलं.

मृणाल पाटील
कार्यक्रम खूप छान वाटला. साचेबद्ध करिअरपेक्षा एक नवीन फिल्ड समोर आलं आणि इतक्या वेगळ्या क्षेत्रांत मुलींना संधी उपलब्ध आहे हे समजलं. पुस्तकी ज्ञानापेक्षा इंटर्नशिप करून मिळणारा अनुभव गुरू ठरतो हे त्यांच्या बोलण्यातून प्रकर्षांने जाणवलं आणि पटलंसुद्धा! सेलिब्रिटी ब्रॅिण्डगची स्वत:ची कंपनी सुरू करणं ही त्यांची कल्पनाच युनिक वाटली.
छायाचित्रे : सम्जुक्ता मोकाशी, मानस बर्वे