मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात वादळी पावसामुळे नुकसान
- कोल्हापुरातील एलबीटी विरोधातील आंदोलन आजपासून मागे
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- स्थानिक संस्था कर जकातीशी समतुल्य उद्योगांना सवलती कायम
- विद्यार्थिनींच्या गाडीने सुटीत अर्थार्जनाची गोडी लावली
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
नकोसे वाटणारे स्पर्श, घाणेरडय़ा कॉमेंटस् इथपासून बलात्कारापर्यंतच्या अनेक अनुभवांतून मुली पोळल्या जात आहेत. मुली तसेच स्त्रियांवरील याच अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी आपली तरुणाई आपल्या वैयक्तिक मतांमधून अशा घटनांची निंदा करतेय, शिवाय या वास्तवाला भिडायचं असेल तर सामाजिक नात्यांसंदर्भातल्या जुन्या चौकटींच्या पलीकडे पाहण्याची जिगर दाखवावी लागणार आहे, असंही ठामपणे सांगतेय..
अनघा वासकर
एखादी सर्वसामान्य स्त्री असो किंवा प्रचलित स्त्री असो, स्तर वेगळा, तीव्रता वेगळी, पण प्रत्येकीला भोगावं लागतं ते एकच.. प्रचंड दडपण! कुणीही येऊन काहीही करून जाईल याची अखंड भीती, त्यात लज्जा, विनय वगरे गोष्टी स्त्रियांचे अंगभूत दागिनेच मानले गेल्यामुळे एखाद् दुसरा अपवाद वगळला, तर लैंगिक छळवादाचा प्रतिकार तर सोडा, पण त्याबद्दल कुणी फारसं बोलतही नाही. काही एक काळानंतर स्त्रिया आपोआप सहन करायला, दुर्लक्ष करायला, टाळायला शिकायला लागतात. हे सर्वसाधारण चित्र आहे. अशा काही प्रश्नांची उकल करण्यासाठी धर्याने अशा प्रसंगांना समोर जाण्यासाठी आता खंबीर पावलं उचलली गेलीच पाहिजे आणि त्याची सुरुवात आम्हा तरुणांकडूनच होईल हे नक्की.. स्त्रियांचा छळ करणाऱ्या अशा विकृत माणसांना फासावर लटकवा अथवा भर रस्त्यात जमलेल्या आम्हा स्त्रियांच्या ताब्यात द्या.. मग बघा!
त्रिवेणी भोसले
'महिलांवर होणारे अत्याचार केवळ कडक कायदे करून थांबणार नाहीत. महिलांकडे बघण्याची समाजाची मानसिकता जोपर्यंत बदलणार नाहीत, तोपर्यंत अशा घटना घडतच राहणार. ही परिस्थिती बदलण्यासाठी पुरुषांमध्ये संस्कार निर्माण करण्याची गरज आहे. स्त्रियांवरचे अत्याचार वाढलेत हे जरी खरं असलं तरी पुरुषांनी त्यांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. म्हणून शाळेपासूनच स्त्रियांबद्दल आदराची भावना निर्माण होण्याच शिक्षण खास मुलांना द्यावं. स्त्री म्हणजे केवळ भोगवस्तू नसून ती माणूस आहे हे जोपर्यंत कोणत्याच मुलाला कळत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही. दे शुड बी अ जंटलमेन नॉट अॅट ऑल..'
मी स्वत: माझ्या संरक्षणासाठी जमलं तर सेल्फ प्रोटेक्शनचं ट्रेनिंग घेईन. डान्स किंवा ज्वेलरी मेकिंग क्लासेस सोबतच 'कराटे' क्लासेसमध्ये आपण मुलींनी आता गर्दी केली पाहिजेच.
कीर्ती मराठे
आपल्या भोवताली वावरणाऱ्या, मुलींना त्रास देणाऱ्या पुरुषांमध्येच आपापले वडील, भाऊ, नवरे आहेत. इतकंच नव्हे, तर इतर मुलींना त्रास देणाऱ्या, त्याची मजा बघणाऱ्या गटामध्ये आपणही आहोत. मुलांनी आपल्याकडे पाहावं, आपलं कौतुक करावं म्हणून नटणाऱ्यांमध्येही आपण आहोत हे लक्षात घेतलं, तर प्रश्नाचं गुंतागुंतीचं स्वरूप लक्षात यावं. म्हणून जुनीच मानसिकता घेऊन केवळ या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने उत्तरं शोधता येणार नाहीत. सर्वच सामाजिक नात्यांच्या चौकटीकडे नव्याने बघण्याचा दृष्टिकोन स्वीकारला तरच काही उत्तरं मिळू शकतील. जुन्याच सामाजिक चौकटीत स्त्रियांची मानसिकता तरी अचानक कशी बदलणार? हा प्रश्न आहेच, परंतु स्त्री-पुरुषांमधील अन्याय्य संबंध स्त्रियांनाच जर सर्वाधिक त्रासदायक असतील, तर त्यांनीच सर्वप्रथम त्याविषयी नव्या दृष्टीने विचार करायला हवा. म्हणून जुन्या मानसिकतेच्या चौकटीत राहून या प्रश्नांची उत्तरं शोधता येणार नाहीत, हे मुलगी किंवा स्त्रीवरील होणाऱ्या अत्याचाराच्या निमित्ताने आपण सर्वानी लक्षात घ्यायला हवं.
श्रुतिका भोसले
वास्तविक मुलींना, स्त्रियांना बलात्कार हा शब्द उच्चारायलासुद्धा आवडत नाही. लैंगिक अत्याचार असं म्हणून त्या बलात्कार या शब्दाचा उच्चारही टाळतात. परंतु सद्यपरिस्थिती पाहता घरात, दारात, रस्त्यावर, गर्दीच्या ठिकाणी, निर्जन ठिकाणी अगदी कुठेही लैंगिक छळवणुकीचा अनुभव येण्याची शक्यता आहे. जर माझ्यासमोर भविष्यात अशी परिस्थिती उद्भवली तर नुकताच दिल्ली घटनेच्या दरम्यान एका पोलीस अधीक्षकाने सांगितल्याप्रमाणे नक्कीच मी चाकूचा वापर करेन. आजवर कधी कुणावर चाकू चालवला नाही पण आता मात्र चाकू कसा चालवावा, वार कसा करावा याचे चोख प्रशिक्षण मी घेईन.
स्नेहल भुजबळ
सेक्स या विषयावर चांगलं-वाईट काहीही डोन्ट िथक, डोन्ट टॉक पद्धतीमुळे पुरुषांची वृत्ती अशी बनली आहे. मुळात एकीकडे बाईला माता, देवी असं मानतात, दुसरीकडे एकदम उपभोगाचं साधन. मुळात दे गिव्ह अस स्टेटस' हे मला मान्य नाही. दोघांनाही इक्वल लेव्हल द्या, प्रॉपर एजमध्ये सेक्स एज्युकेशन द्या, तर प्रॉब्लेम सुटतील.'
स्त्रियांच्या नाही म्हणण्याचा अर्थ पुरुष होय असा घेतात आणि मग हे सगळं सुरू होतं असंही मला वाटतं. मी नाही म्हणते तेव्हा त्याचा अर्थ नाही असाच असतो हे मुलींनी ठामपणे सांगितलं पाहिजे माझ्यावर जर अशी वेळ आली तर स्वसंरक्षणासाठी चकमा देऊन पळण्याचा पर्याय आहेच शिवाय आपल्याजवळ तिखटाची पुडी ठेवून त्याचा योग्य असा चलाखीने वापर करून पळ काढण्यात नक्कीच यशस्वी होईन.
सुप्रिया परब
मुलींच्या पातळीवरून चालणारे लैंगिक छळवणुकीचे प्रकार पाहिले असता त्याबद्दल त्या कसा विचार करतात हे लक्षात घेतलं, तर समाजात स्त्री विरुद्ध पुरुष अशी एक घनघोर लढाईच सुरू आहे, की काय असा प्रश्न पडतो, पण आपल्याकडच्या परिस्थितीच्या संदर्भात विचार करायचा तर या लैंगिक छळवणुकीला काही वेगळे कंगोरे आहेत.
मुलींना लैंगिक छळवणुकीची तुम्ही कशी व्याख्या कराल, असं विचारलं तर विशिष्ट नजरेने बघण्यापासून ते बलात्कारापर्यंत प्रत्येक गोष्टीला लैंगिक छळवणूक म्हटलं पाहिजे. मग कुणी वाईट नजरेने बघितलं तरी कमरेचा पट्टा काढून त्या राक्षसाला मारायची तयारी ठेवा, असे आवाहन मी माझ्या प्रत्येक स्त्री-मत्रिणीला करेन. गोष्ट बलात्कारापर्यंत पोहोचण्याआधीच त्या विकृत माणसाला वठणीवर आणा.
मनोज यावले
दिल्ली येथील झालेल्या बलात्काराच्या घटनेची मी खरोखर तीव्र शब्दांत िनदा करतो. पण दुसरी बाजू अशी की मुलींनीसुद्धा आपण भारतीय आहोत हे न विसरता शिवाय बाहेरील अन्सीक्यूर जग लक्षात घेता व्यवस्थित राहिलं पाहिजे. जेणेकरून अशा प्रकारांना काही प्रमाणात मुलीही जबाबदार असतात, असा टोला लोकांकडून लगावला जाणार नाही.
मुलीपण भडक राहतात. रस्त्याने जाताना मोठय़ाने बोलतात, हसतात म्हणून मग मुलं असं वागतात. कपडय़ांवर काही नसतं, पण एखादी मुलगी शॉर्ट किंवा अगदीच मिनी घालून आली, तर जास्त शिटय़ा पडतात आणि मग वाईट प्रकार घडतात. पण यापुढील अशा प्रत्येक घटनेचा विरोध करण्यासाठी मुलींनी सावधानता बाळगावी. वेळ आल्यास प्रतिकार करण्यासाठी जपून हत्यार वापरावे.



















@मनोज यावले , जग फक्त मुलींसाठीच का unsecure आहे हा खरा प्रश्न आहे. दुसर्या भारतीय नागरिकाचा शिट्ट्या वाजवून अपमान करण्याचा हक्क कोणत्या नागरिकाला कसा काय मिळू शकतो ? आणि तोकडे कपडे तर मुले पण घालतात बरेच वर्षांपासून, अर्धी चड्डी व बिनबाह्यांचे पारदर्शक शर्टस वगैरे. मुलेही भडक वागतात, मोठमोठ्याने बोलतात, हसतात. मग मुलींची टोळकी शिट्ट्या वाजवताना का दिसत नाहीत नाक्या-नाक्यांवर ? विचार करून आत्मपरीक्षण करण्याचा विषय आहे हा.