viv30लग्नविधींचे सोहळे झाले आणि त्याला उत्सवी स्वरूप आलं. आजच्या तरुणाईला त्याच्या पुढे जात आपल्या लग्नाची काही तरी ‘युनिक’ आठवण मनात ठेवायची आहे. ‘कुछ हटके’ करणाऱ्यांच्या या जमान्यात लग्न समारंभांमध्ये वेगवेगळे प्रयोग दिसायला लागले आहेत. त्याविषयी..
ठेवणीतल्या कपडय़ांचा सुवास, वैविध्यपूर्ण पक्वान्नांची रेलचेल, वातावरणात भरलेला तो पक्वान्न आणि अत्तरांचा एकत्रित सुवास, जोडीला सतत उडणारे फ्लॅश त्यामागे दडलेले उत्सवमूर्ती आणि मग ‘शुभ लग्न सावधान’चा मंत्रगजर.. तुळशीच्या लग्नानंतर आता असे लग्न सोहळ्यांचे दिवस सुरू झाले आहेत.. या टिपिकल लग्नाळू वातावरणाला थोडा ट्विस्ट देण्याचे प्रयत्न सध्याची पिढी करताना दिसतेय. म्हणजे ‘शुभ मंगल सावधान’चा मंत्रोच्चार गुरुजींनी केला आणि अचानक समोर दिसणारे वधू-वर आणि  viv31 त्यांच्याबरोबरची स्टेजवरची सगळी मंडळी अचानक गोल फिरायला लागली तर? लग्नासाठी जमलेल्या पाहुण्यांना अवाक करणारं असं फिरतं स्टेज हल्ली अनेक लग्नांत सर्रास वापरलेलं दिसतंय. उद्देश हा की – आलेल्या पाहुण्यांना नवरा मुलगा आणि नवरी मुलगी सहज दिसावेत. अशा सजवलेल्या फिरत्या मंचावरचे त्यांचे फोटो पण सुंदर येतात.  
आर्ट फोटोग्राफी अ‍ॅडव्हेंचर क्राफ्टचे विनायक पुराणिक म्हणाले, ‘लग्नातल्या विधींपासून ते कपडय़ांपर्यंत आणि स्टेज डेकोरेशनपासून वेडिंग अल्बमपर्यंत तरुणाईला वेगळेपण हवं असतं. लग्न सोहळ्यांवर टीव्ही आणि सिनेमा माध्यमांचा प्रभाव आहे. सध्या डेस्टिनेशन वेडिंगकडे तरुणाई वळतेय. लोणावळ्यासारख्या ठिकाणी अशी लग्नं होताहेत. विधींमध्येही स्वत:चं वेगळेपण जपण्यासाठी यज्ञकुंडावर वारली पेंटिंग करून घेण्यात येते.’ प्रीवेडिंग शूटचा सध्या ट्रेण्ड असल्याचं पुराणिक यांनी सांगितलं. नवरा मुलगा आणि नवरी मुलगी एकमेकांना पहिल्यांदा भेटले त्या ठिकाणी जाऊनही हे शूट करतात आणि आठवणींना उजाळा देतात. लग्नाच्या नेहमीच्या अल्बमऐवजी कॉफी टेबल बुक करण्याकडे अनेकांचा कल दिसतो, असं त्यांनी सांगितलं.
लग्नाचं ब्रॅण्डिंग
viv36सध्या ‘कुछ हटके’ करणाऱ्यांचा जमाना आहे. प्रत्येकाला आपल्या लग्नात काही तरी वेगळं, युनिक, लक्षात राहिलं पाहिजे, असं करायला हवं असतं. लग्नविधींचे सोहळे झाल्यानंतर तर असं व्हायला बराच मोठा स्कोपही असतो. त्यातूनच अशा आयडिया येत राहतात. लग्न सोहळ्यांमध्ये फोटोग्राफर्सची गर्दी वाढलेली आहे. डिजिटायझेशनचे प्रयोग करून नवीन पिढी विवाहाचे हे क्षण आयुष्यभर जपून ठेवण्याच्या मागे आहे. आपला लग्न सोहळा आपल्याबरोबर उपस्थित पाहुण्यांनीही लक्षात ठेवावा, यासाठीदेखील आता विशेष प्रयत्न केले जातात. त्यातूनच लग्न सोहळ्याचंही आता ब्रॅिण्डग करण्याचा ट्रेण्ड आलाय. लग्नात यजमानांकडून भेट मिळणाऱ्या रिटर्न गिफ्टवरदेखील आता नवरा-नवरीचे फोटो असतात. काही ठिकाणी तर सोहळ्याचा कलर कोड दिला जातो तो पाहुणे म्हणून येणाऱ्या मंडळींनीसुद्धा पाळायचा असतो.
या बाबतीत केतन नागोटकर म्हणाला, ‘लग्न हा पण खरा एक फेस्टच आहे. आयुष्यात एकदाच येणारा. मग आपण याचं ब्रॅिण्डग का करू नये. म्हणून मी माझ्या लग्नासाठी माझा आणि माझ्या होणाऱ्या बायकोच्या नावाचा लोगो बनवला आहे. हा लोगो आम्ही लग्नाच्या गाडीवर, सजवलेल्या स्टेजवर आणि भेट द्यायच्या पिशव्यांवरसुद्धा पिंट्र करणार आहोत, जेणेकरून माझं लग्न आलेल्या प्रत्येक माणसाच्या लक्षात राहील.’
मिश्र संस्कृतीचे प्रयोग
या हटके प्रयोगांचा आणखी एक उद्देश म्हणजे, आलेल्या पाहुण्यांना कंटाळा न येऊ देणे. या सोहळ्यात वधू-वरांकडे सगळं अटेन्शन राहावं, हा प्रयत्न असतो. आपलं कार्य इतरांपेक्षा कसं वेगळं होत हे दाखवून देत उपस्थितांना एक वेगळा अनुभव देण्याचाही त्यात प्रयत्न असतो. प्रत्येक जण हा आपल्या बजेटप्रमाणे या देखाव्यात बदल करत असतो. अनुजा फाळे म्हणाली, ‘माझी वाहिनी मूळची स्कॉटलंडची आहे. त्यामुळे तिला इथली संस्कृती ही फक्त सिनेमांमधूनच दिसली होती. तिच्यासाठी आम्ही लग्नात ‘मेहंदी’सारखे मराठी विधीत न बसणारेही काही प्रकार केले आणि आम्हाला पण खूप मजा आली. लग्नाला आलेल्या पाहुण्यांकडूनही याला चांगला प्रतिसाद आला.’
बदलतं डेकोरेशन आणि लग्नाची मूव्ही
लग्नाच्या स्टेजचं डेकोरेशनही हल्ली बदलतंय. नेहमीचं फुलांच्या, पडद्यांच्या, दिव्यांच्या सजावटीपेक्षा जास्त महत्त्व मागच्या स्क्रीनला दाखवणाऱ्या त्यांच्या फोटोंना असतं. मागच्या पडद्यावर वधू-वरांचे लहानपणापासूनचे फोटो दाखवून एका फिल्मचा आविष्कार साधला जातो. सकाळी झालेल्या लग्नाचं संध्याकाळी रिसेप्शन असेल तर रिसेप्शनला आलेल्या पाहुण्यांच्या स्वागताला मुलगा आणि मुलगी यांचे लग्नविधीतले फोटोचे ‘स्टॅण्डी’ बॅनर वापरतात. यातली स्वस्तात स्वस्त गोष्ट म्हणजे डिजिटल पत्रिका. यात मजकूर हा त्या जोडप्यावर आधारित असतो आणि तो आधी सोशल मीडियावर पाठवलाही जातो. काही अचाट माणसं तर लग्नाची फिल्म बनवतात. त्यात सासू-सासऱ्यांचे इंटरव्हय़ू, मेकअपपासूनची तयारी, अगदी पाहुण्यांना आणायला एअरपोर्टपर्यंतच्या प्रवासाचं फुटेजही वापरलेलं असतं. या सगळ्यांचे इंटरव्हय़ू आणि विधी सगळं मिळून साधारण दोन तासांची लग्नाची मूव्ही बनवतात. अर्थात हा सगळा पैशांचा खेळ म्हणता येईल. पण यात नव्या आयडिया असतात आणि येणाऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी क्रिएटिव्हिटीसुद्धा लागतेच. याबाबत तेजस जोशी म्हणाला, ‘आपल्याकडे लग्नात पसा कसा संपतो ते कळतच नाही. कितीही प्लॅनिंग केलं तरी आयत्या वेळेला आपल्याला काही तरी नवीन करावंसं वाटतंच. माझ्या भावाच्या लग्नात पण असंच आयत्या वेळेला मला लग्नाची ऑनलाइन पत्रिका बनवाविशी वाटली आणि मी ती बनवली. आलेल्या सगळ्या पाहुण्यांना ती फार आवडली. लग्न सोहळ्याला ती एक वेगळी आठवण देऊन गेली.’
लग्न सोहळे अविस्मरणीय करण्यासाठी तरुणाईची ही धडपड बघता, कोणत्या लग्न समारंभाला आपल्यासाठी काय सरप्राइज येईल ते सांगता येत नाही. सो बी रेडी फॉर इट.

‘‘लग्न हा पण खरा एक फेस्टच आहे. आयुष्यात एकदाच येणारा. मग आपण याचं ब्रॅिण्डग का करू नये.’’
– केतन नागोटकर

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी