लग्नाच्या खर्चिक याद्यांमधील एक गोष्ट म्हणजे लग्नपत्रिका.  लग्न पत्रिका मिळणं किंवा न मिळणं ही अजूनही मागच्या पिढीसाठी प्रतिष्ठेची बाब असते. पण आजची तरुणाई लग्नसमारंभात होणाऱ्या या अतिरिक्त खर्चाबद्दल जागरुक झाली आहे.  लग्नातील पत्रिकांवर होणारा अतिरिक्त खर्च, कागदाची नासाडी या सर्वावर उपाय म्हणून ई-लग्नपत्रिकेचा पर्याय समोर आलेला आहे. सध्याच्या घडीला लहानांपासून थोरामोठ्यांचे एकतरी ईमेल आय.डी. असतोच. या ई लग्नपत्रिकांची लिंक मेल आयडीवर पाठवली जाते. त्यामुळे प्रत्येकाला अगदी दुसऱ्या क्षणाला पत्रिका मिळते. त्याच बरोबर पत्रिकेची लिंक फेसबुकसारख्या सोशल नेटवìकग साईटवर अपलोड करून तारीख रिमायंडर लावून ठेवताही येते.
‘वी गेटिंग मॅरीड डॉट कॉम’ चे संचालक अपूर्व कालरांच्या मते, ‘ या इ लग्नपत्रिका म्हणजे लग्नाची वेबसाईट असते. वरवधू त्यांना हवी तशी ती डिझाईन करू शकतात. त्यात संगीत, फोटोज आणि व्हिडीओज टाकू शकतात. तसंच त्यांच्या लग्नाची तारीख, हळद, संगीत यांसारख्या कार्यक्रमांची वेळ, ठिकाण यांची माहिती त्यात टाकू शकतात. या पत्रिकांची लिंक जगभरातील तुमच्या नातेवाईकांना पाठवू शकतात.’   
परदेशात जोम पकडलेली ही संकल्पना भारतातही रुळू लागली आहे. या वेबसाईट डिझाईन करण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य वरवधूंना दिलं जातं. तुम्हाला विशिष्ट काळासाठी तुमच्या नावाचे डोमेन नेम विकत घ्यावे लागते. त्यानंतर तुम्हाला हव्या त्या थीमनुसार तुम्ही वेबसाईट डिझाईन करू शकता. ‘वी गेटिंग मॅरीड डॉट कॉम’ सारख्या ऑनलाईन लग्नाच्या वेबसाईट्स बनवणारया कंपन्या त्यांचा संपूर्ण कारभार इंटरनेटवरून सांभाळतात. प्रत्येक थीमनुसार काही प्रीसेट वेबसाईट्स त्यांच्याकडे तयार असतात. त्यात तुम्हाला आवश्यक असलेले बदल हे तुम्ही घरबसल्या करू शकता.
तुमच्या मित्रमंडळात एखादा वेब डिझाईनर असल्यास तुम्ही त्याच्याकडून तुमच्या लग्नासाठी युनिक अशी वेबसाईट डिझाईन करू शकता. आज कित्येकजण एखाद्या सुपरहिरो किंवा कॉमिकच्या थीमनुसार आपली लग्नाची वेबसाईट डिझाईन करून घेतात. तर काहीजण छोटेसे मजेदार खेळ तयार करून ही वेबसाईट अधिक आकर्षक करतात. लव्ह मॅरेज करणारे जोडपी त्यांची पहिली भेट, पहिली भेटवस्तु, प्रपोजल अशा कित्येक आठवणी या साईट्सवर टाकतात. त्यांचे व्हिडीयो बनवून पाठवण्याचीही सोय यात असते. लग्नानंतरही लग्नाचे, हनिमूनचे फोटोज यावर टाकता आणि इतरांसोबत शेअर करता येतात. अपूर्व कालरांच्या म्हणण्यानुसार, ‘भारतीय तरुण या संकल्पनेला उत्तम प्रतिसाद देत आहेत. मागील दोन वर्षांत आम्ही ७००० हून अधिक जोडप्यांच्या लग्नाच्या वेबसाईट्स डिझाईन केल्या आहेत. पारंपारिक लग्नपत्रिकांच्या तुलनेने ई लग्नपत्रिकांचा पर्याय अधिक स्वस्त, सोयीचा आणि इको फ्रेंडली आहे.’
हल्ली व्हॉट्स अपवर खास लग्नपत्रिकाचे इमेज बनवून पाठवली जाते. पण ही पद्धत मित्रांमध्येच सध्यातरी चालू आहे. नातेवाईकांना अशाप्रकारे व्हॉट्स अपवर लग्नपत्रिका पाठवणे घरच्यांना अजूनतरी पसंत नाही.
लग्नाच्या वेबसाईट तयार करणाऱ्या काही साईट्स
http://www.ourwedding.in
http://www.wegettingmarried.com
http://www.myshaadi.in
http://www.wedsinvitation.com

kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Numerology Girls born on this date are lucky for husband
Numerology: नवरा आणि सासरच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरतात या जन्मतारखेच्या मुली; जाणून घ्या त्या तारखा कोणत्या?
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क