नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात इंटरनेट वापरणाऱ्यांची सर्वाधिक संख्या मुंबईत आहे, असं दिसलं. पुण्याचा देशात चौथा क्रमांक लागतो. आजची ही तरुणाई इंटरनेटचा वापर कसा करते, कशासाठी करते आणि दिवसातला किती वेळ इंटरनेटवर घालवते हे शोधण्याचा हा प्रयत्न..इंटरनेट अॅण्ड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया आणि आयएमआरबी यांनी केलेल्या पाहणीतून संपूर्ण देशात सर्वाधिक इंटरनेटचा वापर मुंबईत केला जातो असं निदर्शनास आलं. या लिस्टमध्ये पुण्याचाही देशात चौथा क्रमांक लागतो. अर्थातच इंटरनेटच्या वापरात या शहरांमधली तरुण पिढी अग्रेसर आहे. सतत कोणत्या ना कोणत्या स्क्रीनमध्ये डोकं खुपसून असते, अशी पालकांची नेहमीची तक्रार. मग ती स्क्रीन टी.व्ही.ची असो, मोबाईलची असो, लॅपटॉप, टॅब नाहीतर कॉम्प्युटरची! परदेशातला दादा असो नाहीतर शेजारची ताई घरबसल्या त्यांच्याशी संवाद साधता येतो, अमेरिकेतल्या निवडणुका असो किंवा कॉलेजच्या निवडणुकीची चर्चा आम्ही नेहमीच अपडेट होत असतो, रिअॅक्ट होत असतो तो या इंटरनेटच्या माध्यमातून. तरुण मुला-मुलींमध्ये इंटरनेटचा वापर कशासाठी होतो, किती वेळ होतो हे शोधण्यासाठी आम्ही छोटं सर्वेक्षण केलं. त्यासाठी मुंबई आणि पुण्यातल्या १५ ते २५ वयोगटातल्या १०० मुलामुलींना काही प्रश्न विचारले. ५६ मुली आणि ४४ मुली यांनी आमच्या प्रश्नांना प्रतिसाद दिला. त्यावर आधारित ही निरीक्षणं..सर्वाधिक वापर चॅटिंगसाठीदैनंदिन जीवनात अन्न, वस्त्र, निवारा यासोबत आरोग्य, शिक्षण तर आलेच पण त्यासोबत इंटरनेटसुद्धा आजच्या युवापिढीची गरज होताना दिसतेय. प्रामुख्याने तरुण मुलं-मुली इंटरनेटचा वापर हा संवाद साधण्यासाठी करतात असे दिसून आले. व्हॉट्सअॅपचा वापर त्यात सर्वाधिक केला जातो. त्या खालोखाल हाईक, फेसबुक मेसेंजर, टेलिग्राम यांची सुद्धा चलती आहेच. इमेलच्या माध्यमातून व्यावहारिक आणि औपचारिक संदेशांची देवाणघेवाण चालते. स्नॅपचॅटचा उपयोग करून सध्या आपल्या आजूबाजूला काय चाललंय हे फोटोच्या माध्यमातून सांगणाऱ्याची संख्या सध्या तुरळक आहे. पण ‘सेल्फी’चा वाढता प्रभाव पाहता त्यात वाढ होईल असं वाटतं. इंटरनेट उपलब्ध असेल तर कितीही वेळ मेसेजिंग अॅपच्या साहाय्याने संवाद साधता येतो. स्काईपच्या मदतीने तर थेट परदेशी असणाऱ्या व्यक्तीशी व्हिडीओ चॅटिंग सहज शक्य होते. त्यामुळे मोबाईल नेटवर्क देणाऱ्या कंपन्यांचे कॉल रेट आणि एस.एम.एस. रेट या तुलनेत इंटरनेटच्या मदतीने संवाद साधणं तरुणांना परवडतं. त्यामुळे चॅटिंगसाठी इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे, असं म्हणायला हरकत नाही.सोशल नेटवर्किंगमध्ये फेसबुकच हिटमेसेजिंगव्यतिरिक्त इंटरनेट वापरले जाते ते सोशल नेटवìकग साईट्सकरता. आपल्या आयुष्यातल्या घडामोडी स्टेटसच्या किंवा फोटोच्या रूपाने सतत पोस्ट आणि अपडेट केल्या जातात. त्यावर येणाऱ्या लाईक्स आणि कमेंट्स पाहण्यासाठी ऑनलाईन राहावंच लागतं. तसंच मित्रमत्रीणीच्या आयुष्यात काय चाल्लंय हे त्यांच्या पोस्ट पाहून लक्षात येत असतं. कोण कोणत्या ठिकाणी आहे, काय फील करतंय, रिलेशनशिप स्टेटस काय आहे, कोणाचा नवा लुक कसा आहे हे सारंकाही फेसबुकवर अपडेट होतं आणि ते जाणून घेण्यात तसा सर्वाना रस असतो. नवनवीन व्हिडीयो, स्टोरीज शेअर केले जातात. नवनवीन मित्रमत्रिणी हमखास बनवता येतात म्हणून तरुणांची सर्वाधिक पसंती फेसबुकला आहे. काहीजणांना तर दिवसभरात फेसबुक पेज पहिले नाही तर दिवस अपुरा वाटतो. स्मार्टफोनच्या वापरामुळे फोटो काढणं सहज शक्य आहे आणि इन्स्टाग्रामच्या मदतीने ते शेअर केले जातात. मुली या फोटो शेअिरगमध्ये मुलांपेक्षा जास्त आघाडीवर आहेत. ट्विटरवर असणाऱ्या शब्द मर्यादेमुळे कदाचित त्याचा वापर कमी केला जातो. मात्र सेलिब्रिटींना फॉलो करून त्यांच्याबद्दल जाणून घेता येतं. एकूणच त्यांच्याशी थेट संपर्कात आहोत असं वाटतं. त्यामुळे थोड्या प्रमाणात का होईना पण ट्विटर वापरलं जातं. सोशल नेटवìकगमधून तरुणांना व्यक्त होण्याचं माध्यम मिळालंय असं वाटतं. आपले कुणीतरी ऐकणारे आहे, जिथे आयुष्यातली लहानातल्या लहान गोष्टी शेअर करता येतात ज्याची दूर कुठे तरी असणाऱ्या व्यक्तीकडूनही दखल घेतली जाते, सल्ले मिळतात अशी भावना आहे. त्यामुळे इंटरनेटचा वापर हा सोशल नेटवìकग करता अधिक केला जातो. कधी कधीतर अनेक मुलं फेसबुकच्या अधीन गेलेली दिसतात. त्यासाठीच दिवसभर ऑनलाईन असतात.माहितीपेक्षा मनोरंजनासाठी वापर जास्तत्यानंतर तरुणांना मनोरंजन करून घेण्यासाठी इंटरनेट मदतशीर ठरते. सिनेमा पाहणं असो अथवा आवडत्या सीरिअलचा बघायला न मिळालेला एपिसोड असो त्यासाठी यूट्युबची मदत होते. ई बुक वाचण्यासाठी आणि ऑनलाईन गेम खेळण्यासाठी, गाणी डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेट वापरलं जातं. मोबाईलमध्ये विविध अॅप डाउनलोड करता येतात. लाइफस्टाइल, स्पोर्ट्स गेम, कॉमिक अशा प्रकारचे अॅप घेण्याकडे तरुणांचा कल दिसतो. माहिती जाणून घेण्याकरता होणारा इंटरनेटचा वापर हा संवाद साधण्यासाठी, सोशल नेटवìकग आणि मनोरंजन करून घेण्यासाठी होणाऱ्या वापरापेक्षा कमी आहे. एखाद्या विषयातील रिसर्च करण्यासाठी अथवा गुगल मॅप वरून पत्ता शोधण्यासाठी इंटरनेटची मदत होते. बातमी, एखाद्या पर्यटन स्थळाची, हॉटेल्सची, एखाद्या जागेची माहिती, रिव्हू जाणून घेण्यासाठी ऑनलाईन सर्च होतात. नवनवीन ऑफर्स जाणून घेण्यासाठी दोन चार साईटस घरबसल्या धुंडाळता येतात. कमी वेळात जास्तीत जास्त माहिती इंटरनेटमुळे उपलब्ध होते. शॉिपग सुद्धा इंटरनेटच्या सहायाने सहज शक्य झाली आहे. या इ बँकिंग, मनी ट्रान्सफर आणि ऑनलाईन शॉिपगसाठी प्रामुख्याने इंटरनेट वापरणारे अगदी कमी आढळले.मोबाईलवर नेटतरुणांकडून सर्वाधिक इंटरनेटचा वापर हा मोबाईल वरून केला जातो. त्यानंतर लॅपटॉप, टॅब किंवा डेस्कटॉपद्वारे कनेक्टिव्हिटी मिळते. चॅटिंग, सोशल नेटवìकग मोबाईलवरून केलं जातं तर ऑनलाईन गेम्स, सिनेमा पाहणे अशा गोष्टीसाठी लॅपटॉप, डेस्कटॉपचा वापर केला जातो. मोबाईलमध्ये साधारण 2 जीबीचा नेटपॅक तसा पुरेसा पडतो. पण अॅप अपडेट करण्यासाठी वायफायला पसंती मिळते. कारण ते लवकर होतं. नेटपॅकच्या वाढत्या किंमतीमुळे अनलिमिटेड वाय फायचे प्लॅन अनेक तरुणांना भुरळ घालत असल्याचं दिसतं. एका वेळी अनेकजण आणि अनेक साधनांवरून त्याचा वापर करू शकतो पण घराबाहेर गेल्यावर त्याचा वापर करता येत नाही. त्यामुळे कितीही महाग झालं तरी मोबाईलवर नेटपॅक घेणं हल्ली तरुणांसाठी अनिवार्य झालं आहे.दिवसातले तीन तास इंटरनेट वापरण्याच्या वेळाविषयी विचारलं असता तरुणांनी मेसेजिंग करता २४ तास डेटा कनेक्शन चालूच असल्याचं सांगितलं. इंटरनेट सर्फिगसाठी दिवसभरातला अंदाजे किती वेळ घालवता या प्रश्नावर ५५ टक्के तरुणांनी २ ते ३ तास तर ३३ टक्के तरुणांनी ४ ते ते ६ तास सर्फिग करतो असं सांगितलं. बाकीची मुलं सात- आठ तास इंटरनेटवर घालवतात. प्रामुख्याने ऑनलाईन गेम किंवा सोशल नेटवर्किंग यासाठी हे जास्तीचे तास ते इंटरनेटचा वापर करतात, असं लक्षात आलं.इंटरनेट वापरण्यासाठी कोणतं साधन वापरता? मोबाईल - ७५ डेस्कटॉप - ४४ लॅपटॉप - ४५ टॅब - १२(एका व्यक्तीकडून एकापेक्षा जास्त साधनांवरून इंटरनेटचा वापर केला जातो)कोणत्या सोशल नेट्वर्किंग साईटचा वापर तुम्ही सर्वाधिक करता? फेसबुक - ८९ ट्विटर - १६ इंस्टाग्राम - ३९दिवसातील किती वेळ तुम्ही इंटरनेटचा वापर करता?३-४ तास- ५५५-७ तास- ३३७ तासांहून अधिक- १२चॅटिंगसाठी कोणतं एक मेसेजिंग अॅप जास्त वापरता?व्हॉटसअॅप - ९४हाईक - ३२फेसबुक मेसेंजर -१६स्नॅपचॅट -२०टेलिग्राम - १०स्काईप- २०तुम्ही प्रामुख्याने इंटरनेट कोणत्या कारणासाठी वापरता ? संवाद साधण्यासाठी- ५९ माहिती जाणून घेण्याकरता- ४१ मनोरंजनासाठी- ४१ सोशल नेट्वर्किंग- ५२ ऑनलाईन व्यवहार ३६इंटरनेट हि आता अत्यावश्यक गरज झाली आहे असे तुम्हाला वाटते का? हो- ९५नाही-५(संकलन सहाय्य : भक्ती तांबे, तेजल सप्रे, गार्गी गीध, प्रियांका खानविलकर, राधिका कुंटे ,मानस बर्वे.)