खूप दिवस करायची असं ठरवलेली एखादी ब्युटी ट्रीटमेंट, मेक-ओव्हर स्वत:वर खूश होण्यासाठी करून बघायला हरकत नाही. एखादी आवडीची छानशी फिल्मसुद्धा ते काम करू शकते. किंवा नवीन उघडलेल्या कॉफी शॉपमध्ये जाऊन प्यायलेली वाफाळती कॉफी आणि समोर आवडत्या लेखकाचं पुस्तक हेदेखील एखाद्या स्पाचं काम करू शकतं. तुम्ही जर कधी स्वत:ला गिफ्ट दिलं नसेल तर यापुढे नक्की देऊन बघा, एकटं काहीतरी करण्याचा हा खूप वेगळा अनुभव असेल. * स्पा ट्रीटमेंट, मेक ओव्हर, * आवडत्या सिनेमाची ट्रीट, * शॉपिंग आणि सेल्फ गिफ्टिंग, * आवडत्या पदार्थाची ट्रीट * आवडत्या ठिकाणाला दिलेली भेट : लाँग ड्राइव्ह