एवढय़ा सगळ्या माध्यमांच्या गर्दीतही व्यक्त होण्यासाठी पुस्तक हे माध्यम आजही तरुणाईला साद घालतं. तरुण पिढी वाचते आणि लिहितेही. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने एका नव्या कोऱ्या इंग्रजी पुस्तकाच्या तरुण मराठी लेखिकेचं मनोगत..

मुंबईच्या एका उपनगरात सर्वसामान्य मुलीसारखं आयुष्य जगल्यानंतर तारुण्याची चाहूल लागत असतानाच मेडिकलच्या शिक्षणासाठी मुंबईबाहेर पडले. प्रवरेला मेडिकलच्या शेवटच्या वर्षांची परीक्षा मी नुकतीच दिलीय. घरापासून दूर तिथे मित्र-मैत्रिणींच्यात रमत असतानाच अनेक गोष्टी शिकायला, बघायला, अनुभवायला मिळाल्या. जुनी नाती जपत असतानाच नवे बंध जुळले. आयुष्यातल्या अनेक नव्या पैलूंशी जवळून ओळख झाली. ते सगळं मांडायला.. व्यक्त व्हायला लिहावंसं वाटलं आणि ‘द अनस्पोकन’ हे पुस्तक आकाराला आलं.
माझी पिढी पुस्तकं  वाचत नाही, हे मला मान्यच नाही. माझ्या वाचनात एक ‘अमेरिकन लिटरेरी रीिडग सव्‍‌र्हे’ नुकताच आला होता. त्यानुसार १९८२ ते २००२ या दरम्यान सुशिक्षित तरुणांच्या वाचनामध्ये तब्बल २० टक्के घसरण झालेली दिसली. बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्याकडे आजही तीच परिस्थिती आहे. पण टेक्नॉलॉजीच्या डेव्हलपमेंटमुळे हल्ली पुस्तकं वाचणं फारच सोपं झालं आहे. ई-बुक्स, टॅब्जमधले निरनिराळे अ‍ॅप्स, गुडरीड्स, ब्लॉगर्सच्या वेब साइट्स यामुळे जगातल्या कुठल्याही लेखकांनी लिहिलेली आपल्या आवडीची पुस्तकं वाचणे सोयीस्कर झालं आहे. फक्त वाचणाऱ्यांनाच नाही, तर माझ्यासारख्या लेखकांनासुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचण्याला याच माध्यमांची खूप मदत झालीय. आपल्या मतांना, विचारांना आकार देण्याचं काम आजही पुस्तकंच करत असतात, हे खरं. आजच्या पिढीला फिक्शन, नॉन फिक्शन, थ्रिलर, लव्ह स्टोरीजबरोबर सेल्फ हेल्प प्रकारची पुस्तकंही भावतात असं दिसतं. लव्ह, रिलेशनशिप, तरुणपणातला संघर्ष हे विषय आजच्या पिढीला जवळचे वाटतात. म्हणूनच ‘चेतन भगत’ या पिढीला भावतो. याशिवाय ऐतिहासिक, पौराणिक पाश्र्वभूमीच्या कादंबऱ्याही आजची पिढी उत्सुकतेने वाचते. म्हणूनच ‘अजया’सारखं महाभारतावर आधारित पुस्तक बेस्ट सेलर ठरतं. प्रत्येक पुस्तक वेगवेगळ्या रूपात माणसाला घडविण्याचा प्रयत्न करत असतं. मित्रत्व, प्रेम, कटुता, राग, काळजी या सगळ्याकडे बघण्याची वेगळी दृष्टी तयार करण्याचं काम पुस्तक करत असतं. याचा एक पलू मी स्वत “ळऌए वठरढडङएठ” या माझ्या पुस्तकात मांडला आहे. कॉलेज लाइफमध्ये फ्रेंडशिप, लव्ह रिलेशन्स, जेलसी, पेरेंटिंग या गोष्टींना सामोरं जावंच लागतं. नवी नाती या काळात जुळतच असतात. पण या सुरेल नात्यांना सो कॉल्ड मिसट्रस्ट किंवा मिसअंडरस्टँडिंगचा बट्टा लागला की, मात्र काही खरं नसतं. यापुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्स्ट फेजमधून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकाला आपापला मार्ग शोधावा लागतो. याचीच कथा द अनस्पोकन या पुस्तकातून मी मांडली आहे.
स्वतच्या कल्पना मांडण्यासाठी पुस्तक हे माध्यम अगदी योग्य आहे असं माझं ठाम मत आहे. मला विचाराल तर पुस्तक हे माणसाचंच दुसरं रूप आहे, जे आपण हातात घेऊन वाचत बसलेलो असतो तेव्हा नकळत आपल्याशी संवाद साधत असतं. बिझी शेडय़ुलमुळे वाचायला वेळ नाही, हे काही पटत नाही. कारण पुस्तकांच्या जगात रमण्यासारखं आयुष्यात दुसरं काहीच नसतं. हॅप्पी रीिडग!
    
आपल्याकडची काही मिनिटं पुस्तकांसाठी काढणं अजिबात अशक्य नसतं. कारण पुस्तकांच्या जगात रमण्यासारखं आयुष्यात दुसरं काहीच नसतं. आणि पुस्तक सोबत असलं की इतर कोणाची फारशी गरजसुद्धा भासत नाही!     – भाग्यश्री
भाग्यश्री खोब्रेकर -viva.loksatta@gmail.com