जिल्हय़ात रस्त्यांच्या विकासासाठी १०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यातून लवकरच रस्त्यांची कामे हाती घेण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली.
बीड तालुक्यातील िलबागणेश येथील विविध कामांचे भूमिपूजन व उद्घाटन क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. डी. बी. बागल, सभापती संदीप क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलिम, महादेवमहाराज भारती, बाजार समिती सभापती अरुण डाके, शेख शफीक आदी उपस्थित होते. मंत्री क्षीरसागर म्हणाले की, जिल्हय़ाने मागील वर्षी टंचाईचा सामना केला आहे. यावर्षी निसर्गाची साथ लाभल्याने पेरणीपुरता चांगला पाऊस झाला असला, तरी पाणीसाठे वाढले नाहीत. राज्यात बंदी घातलेल्या कणक जातीच्या कापूस बियाण्यावरील जिल्हय़ातील शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव तात्पुरती उठविली आहे. येत्या काळात शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू नये, या साठी पाणी अडवा पाणी जिरवा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे.