ऐरोली विधानसभा आणि बेलापुर विधानसभा मतदारसंघातून बुधवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी पाच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे . बेलापुर मधून एक तर ऐरोली येथून चार उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे ऐरोली मधून १५ व बेलापुर मधून १५ उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या उतरल्याचे  स्पष्ट झाले आहे.
बेलापुर विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार मारुती भोईर यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे गणेश नाईक , भाजपाच्या मंदा म्हात्रे, शिवसेनेचे विजय नाहटा, कॉग्रेसचे नामदेव भगत, मनसेचे गजानान काळे, प्रकल्पग्रस्त संघर्ष कृती समितीचे अपक्ष उमेदवार डॉ. राजेश पाटील यांच्यात सरळ लढत होणार आहे. ऐरोली विधानसभा मतदार संघातून आरपीयआयचे सिद्राम ओहाळ, अपक्ष उमेदवार रविद्र पाटील ,दत्तात्रय सावळे, शेखर भावले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे या मतदार स्ांघात राष्ट्रवादीचे संदीप नाईक, शिवसेनेचे विजय चौगुले, भाजपाचे वैभव नाईक, मनसेचे गजानन खबाले, कॉंग्रेसचे रमाकांत म्हात्रे यांच्यात लढत होणार आहे.