मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- पाणी प्रश्नावरून नगरसेवक व नागरिकांनी 'ओसीडब्ल्यू'च्या कार्यालयातील साहित्य जाळले
- शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडणार
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
घरांचे भाव गगनाला भिडल्यामुळे शहरातून उपनगरात आणि उपनगरातून बाहेर फेकल्या गेलेल्या मध्यमवर्गीय मुंबईकरांना आता वसई-विरार वा बदलापूर पट्टा खुणावू लागला आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणारे प्रामुख्याने वसई-विरार पट्टय़ाकडे तर पूर्व उपनगरात राहणारे बदलापूर-अंबरनाथ पट्टय़ाकडे सरकू लागले आहेत. या पट्टयांकडे पूर्वीही मध्यमवर्गीयांचे लक्ष नव्हते, असे नव्हे. परंतु तेव्हा दहिसर वा मुलुंड अगदी विक्रोळी, भांडुपमध्येही घर हाताला लागत होते. परंतु आता पगाराच्या तुलनेत मोठे कर्ज मिळाले तरी मुंबईत घर मिळेलच याची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे मोठय़ा संख्येने मध्यमवर्गीय मुंबईकरांनी ही 'चौथी मुंबई' गाठली आहे. ही गरज ओळखून बिल्डरमंडळीही आपापल्या नवनवीन योजना आणू पाहत आहेत. नसलेल्या सुविधांची अनेक आमीषेही दाखवित आहेत. याची कल्पना असतानाही भविष्यात सुविधा मिळतील या भाबडय़ा आशेने हा मध्यमवर्गीय मुंबईकर आकर्षिला जाऊ लागला आहे.
पश्चिम उपनगरांमधील घरांचे दर...
उपनगर किमान कमाल
गोरेगांव पूर्व- १० हजार रू. प्रति चौरस फूट, १२ हजार रू. प्रति चौ. फू.
गोरेगांव पश्चिम- ११ हजार रू. प्रति चौ. फू. १२ हजार ५०० प्रति चौरस फूट
मालाड पश्चिम- ९ हजार रू. प्रति चौ. फू. १३ हजार रूपये प्रति चौरस फूट
मालाड पूर्व- ८ हजार रू. प्रति चौ. फू. १२ हजार रूपये प्रति चौरस फूट
कांदिवली (पश्चिम) ९ हजार ७०० रू. प्रति चौ. फू. १२ हजार रूपये प्रति चौरस फूट
कांदिवली (पूर्व) ९ हजार रू. प्रति चौ. फू. १२ हजार रूपये प्रति चौरस फूट
बोरिवली (पश्चिम) ९ हजार ५०० रू. प्रति चौ. फू. १३ हजार ५०० रूपये प्रति चौरस फूट
बोरिवली (पूर्व) ९ हजार रू. प्रति चौ. फू. १२ हजार रूपये प्रति चौरस फूट
मिरा रोड (पूर्व) ४ हजार ५०० रू. प्रति चौ. फू. ५ हजार ५०० रूपये प्रति चौरस फूट
विरार ३ हजार ५०० रू. प्रति चौ. फू. ४ हजार ५०० रूपये प्रति चौरस फूट
नायगांव (पूर्व) ३ हजार रू. प्रति चौ. फू. ३ हजार ५०० रूपये प्रति चौरस फूट
वसई- ३ हजार ३०० रू. प्रति चौ. फू. ३ हजार ७०० रूपये प्रति चौरस फूट
पूर्व उपनगरांमधील घरांचे दर
उपनगर किमान कमाल
ठाणे- सहा हजार रू. प्रति चौ. फू. ८ हजार ७०० रूपये प्रति चौरस फूट
डोंबिवली- ३ हजार ५०० रू. प्रति चौ. फू. ५ हजार रूपये प्रति चौरस फूट
कल्याण- ३ हजार ५०० रू. प्रति चौ. फू. ४ हजार ५०० रूपये प्रति चौरस फूट
अंबरनाथ- २ हजार ५०० रू. प्रति चौ. फू. ३ हजार ८०० रूपये प्रति चौरस फूट
बदलापूर- २ हजार ३०० रू. प्रति चौ. फू. २ हजार ६०० रूपये प्रति चौरस फूट
नवी मुंबईतील उपनगरांमधील घरांचे दर
उपनगर किमान कमाल
वाशी- ७ हजार रू. प्रति चौ. फू. १० हजार रूपये प्रति चौरस फूट
ऐरोली- ६ हजार ५०० रू. प्रति चौ. फू. ७ हजार २०० प्रति चौरस फूट
कोपरखैरणे- ६ हजार रू. प्रति चौ. फू. ७ हजार ५०० रूपये प्रति चौरस फूट
सानपाडा- ७ हजार रू. प्रति चौ.फू. ९ हजार ५०० रूपये प्रति चौरस फूट
नेरूळ- ६ हजार रू. प्रति चौ.फू. १० हजार ५०० रूपये प्रति चौरस फूट
बेलापूर- ५ हजार ५०० रू. प्रति चौ. फू. ८ हजार रूपये प्रति चौरस फूट
खारघर- ४ हजार ५०० रू. प्रति चौ. फू. ७ हजार ५०० रूपये प्रति चौरस फूट
कळंबोली- ३ हजार ५०० रू.प्रति चौ. फू. ४ हजार ६०० रूपये प्रति चौरस फूट
पनवेल- ३ हजार ३०० रू. प्रति चौ. फू. ६ हजार ५०० रूपये प्रति चौरस फूट
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















