पंढरपूर तालुक्यातील बोहाळे गावानजीक एका विनाफाटक रेल्वे ओलांडणी मार्गावर रेल्वेची मोटारीला धडक बसून झालेल्या अपघातात मोटारीतील पाचही जण जागीच ठार झाले. सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
बोहाळे गावाजवळील रेल्वेक्रॉसिंगजवळ झालेल्या या अपघातामध्ये मिरज -पंढरपूर पॅसेंजर रेल्वेची संबंधित मोटारीस धडक बसली. या अपघातात संबंधित मोटार रेल्वेबरोबर काही अंतर फरफटत गेली. यात मोटारीतील पाचही जण जागीच ठार झाले. मृतांमधील सर्व जण सांगोला तालुक्यातील खिलारवाडी येथील असून  रात्री उशिरापर्यंत त्यांची ओळख पटलेली नव्हती. मृतांमध्ये दोन पुरुष आणि तीन स्त्रियांचा समावेश आहे.