नृत्यावर आधारित संपूर्ण लांबीचा थ्रीडी चित्रपट हा प्रकार बॉलीवूडला नवीन होता. तरीही नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझाचे दिग्दर्शन असलेला एबीसीडी (एनीबडी कॅन डान्स) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी ठरला. प्रभुदेवा हे एकमेव नावाजलेले नाव वगळता या चित्रपटातील सारे कलाकार नवीन होते आणि तरीही या चित्रपटाने ४४ कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाला मिळालेला हा अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेऊन रेमोने त्याच वेळी चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा केली होती. आता हा चित्रपट आणखी मोठय़ा प्रमाणावर आणि संपूर्णत: अमेरिकेत चित्रित करायचा निर्णय दिग्दर्शक रेमोने घेतला आहे.
‘एबीसीडी’ थ्रीडी आणि टुडी अशा दोन्ही स्वरूपांत प्रदर्शित करण्यात आला होता, पण नृत्यावर आधारित चित्रपटाला किती यश मिळेल याबाबत साशंक असलेल्या रेमोने कमीत कमी बजेटमध्ये हा चित्रपट बनवला. एकूण आठ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये चित्रपट तयार झाला होता. वरचे दीड कोटी प्रसिद्धी आणि विपणनावर खर्च करण्यात आले. प्रभुदेवा हे एकमेव गाजलेले नाव, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्यचा ओळखीचा चेहरा सोडला तर बाकी सगळे कलाकार हे ‘डान्स इंडिया डान्स’ आणि तत्सम रिअॅलिटी शोमधील नर्तक होते. तरीही या चित्रपटाने प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी चार कोटी रुपयांची कमाई केली होती.
‘सिक्वल मोठय़ा स्वरूपात चित्रित करायचा आहे. त्यासाठी लॉस एंजेलिस येथील डिस्नेच्या स्टुडिओत चित्रीकरण करायचे ठरले असून लवकरच मी तिथे जाऊन प्राथमिक काम सुरू करेन,’ असे रेमोने सांगितले. युटीव्ही डिस्ने या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. सिक्वलमध्ये ‘एबीसीडी’च्या त्याच कलाकारांचा ताफा कायम राहणार की नाही हे अजून ठरलेले नसले तरी नायक म्हणून पुन्हा एकदा प्रभुदेवाच्या पदन्यासावरच शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सिक्वलच्या चित्रीकरणाला साधारणत: डिसेंबरमध्ये सुरुवात होणार आहे.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे