शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गाच्या विस्तारीकरणानंतर सर्वाधिक अपघात झालेले ठिकाण म्हणजे रासबिहारी चौक. या परिसरात महामार्ग व सव्‍‌र्हिस रस्ते परस्परांना समांतर आहेत. रासबिहारी चौफुलीवर दिंडोरी, औरंगाबादकडे जाणाऱ्या रस्त्यांसह सव्‍‌र्हिस रस्ते व महामार्ग एकत्र येतात. या चौफुलीवरील अपघातात पादचाऱ्यांसह अनेक वाहनधारकांना प्राण गमवावे लागले आहेत. येथे भुयारी मार्ग करण्यासाठी स्थानिकांनी अनेकदा आंदोलने केली. त्यामुळे आता कुठे ही मागणी मान्य करण्यात आली. तथापि, तो अद्याप प्रत्यक्षात आला नसल्याने अपघातांचा धोका कायम आहे.
क. का. वाघ महाविद्यालयालगत लांबलचक उड्डाणपूल संपल्यानंतर पुढे राष्ट्रीय महामार्ग सव्‍‌र्हिस रस्त्याला समांतर आहे. चारपदरी महामार्ग विस्तीर्ण वाटत असल्याने मालमोटारी व इतर चारचाकी वाहने भरधाव निघतात. शहराची हद्द आडगावला संपते हे त्यांच्या गावी नसते. वास्तविक, महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठी नागरी वसाहत आहे. या भागातील रहिवाशांना शहरात ये-जा करण्यासाठी महामार्ग ओलांडावा लागतो. भरधाव जाणाऱ्या वाहनांमधून तो ओलांडणे आव्हान ठरते.
चौकालगत रासबिहारी स्कूल आहे. या ठिकाणी स्वतंत्र सिग्नलची व्यवस्था नसल्याने वाहतूककोंडी, अपघात नित्याची बाब आहे. क. का. वाघ महाविद्यालयासमोर उड्डाणपूल संपल्यामुळे पुलावरील अवजड वाहने, चारचाकी वाहने तसेच प्रवासी वाहतूक थेट मुख्य रस्त्यावर येते. ही वाहतूक बळी मंदिरापर्यंत आल्यावर नाशिकरोडक डे येणारे-जाणारे तसेच रासबिहारी स्कूलकडून येणारा व जाणारा रस्ता मुख्य रस्त्यापेक्षा काहीसा उंच आहे. यामुळे तो रस्ता ओलांडताना वाहनांचा वेग कमी होऊन जातो. दुसरीकडे ओझर, नाशिक शहर, रासबिहारी आणि हनुमाननगरकडून येणारे रस्ते चौफुलीवर येऊन मिळतात. महामार्गावरील वाहनांचा वेग ६०-८० किलोमीटर असल्याने अपघातांना निमंत्रण मिळते. चौफुलीवरील एक रस्ता दिंडोरीमार्गे पेठ रस्त्याला मिळत असल्याने गुजरात किंवा पुण्याहून ये-जा करणारे टेम्पो व मालमोटारी कंटेनर या चौकातून मार्गस्थ होतात. सिग्नल यंत्रणा नसल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी दोन वाहतूक पोलीस नियुक्त आहेत.
सिग्नल चालू-बंद होण्याचा ठरावीक कालावधी असतो. पण या ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या मनावर वाहतूक किती काळ बंद ठेवायची हे ठरते. ही बाब वाहतुकीला अडथळा ठरते. महामार्गाच्या विस्तारीकरणानंतर या चौकात सर्वाधिक अपघात झाले आहेत. स्थानिकांनी भुयारी मार्ग तयार करण्याची मागणी केली. त्याची दखल घेत भुयारी मार्ग करण्यास मान्यता देण्यात आल्याचे सांगितले गेले. परंतु आजतागायत तो प्रत्यक्षात आला नसल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते.
उड्डाणपूल का खंडित केला?
महामार्गावरील उड्डाणपूल क. का. वाघ महाविद्यालयासमोर का खंडित करण्यात आला, याचा उलगडा आजवर झालेला नाही. वास्तविक पुढे मोठी नागरी वसाहत असल्याने सर्व अवजड वाहनांची वाहतूक पुलावरून पुढे नेत भुजबळ नॉलेज सिटी किंवा त्यापुढील मोकळ्या महामार्गावर उतरविता आली असती. पण तसे झाले नाही. विचित्र परिस्थितीमुळे उद्भवणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डाणपूल पुढे सुरू करावा किंवा या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तसेच वाहतूक विभागाशी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी चर्चा सुरू आहे.
    – रुची कुंभारकर (नगरसेवक)

Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
proposal for widening of uran to panvel road
उरण-पनवेल मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव, नवघर फाटा ते बोकडवीरा पोलीस चौकीपर्यंत चौपदरी मार्ग
The Central Wildlife Board proposed a highway through the largest tiger project in the country
देशातील सर्वात मोठय़ा व्याघ्रप्रकल्पातून महामार्ग जाणार
Washim District, Massive Cash Seizures, border, Ahead of Elections, IT Department, Probe Rs 20 Lakh, lok sabha 2024, marathi news,
वाशीम : सर्वेक्षण पथकाच्या तपासणीत ३६ लाखाची रोकड जप्त; २० लाख संशयास्पद, आयकर विभागाकडून चौकशी