शहरातील टोळीयुद्धाचा परिपाक ठरलेल्या सराईत गुन्हेगार मोहन चांगले आणि दीपक सोनवणे खून खटल्यातील पाचही संशयितांची बुधवारी न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली. या गुन्ह्यात मनसेच्या माजी महापौरांचे बंधू अ‍ॅड. राजेंद्र तथा दादा वाघ हे देखील एक संशयित होते. या खटल्याच्या निकालावेळी दोन्ही बाजूकडील समर्थकांची गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली.
चांगले व सोनवणे यांच्या हत्येला ७ मे रोजी दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. मागील काही वर्षांत शहरात वेगवेगळ्या टोळ्यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. परस्परांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी चांगले व पगारे टोळीत चाललेल्या संघर्षांतून ही घटना घडल्याचे सांगितले जात होते. सराईत गुन्हेगार चांगले आणि सोनवणे हे ७ मे २०१३ रोजी गंगापूर रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये भोजनासाठी गेले होते. या ठिकाणी दोघांचा एका टोळक्याने तीक्ष्ण हत्याराने खून केला. या प्रकरणी रामदास चांगले याने दिलेल्या तक्रारीवरून अ‍ॅड. राजेंद्र ऊर्फ दादा वाघ, व्यंकटेश मोरे, अर्जुन पगारे, गिरीश शेट्टी व राकेश कोष्टी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. सी. शिरसाळे यांच्या न्यायालयात झाली. प्रत्येक तारखेला दोन्ही बाजूकडील शेकडो समर्थक न्यायालयाच्या आवारात जमा होत असत. अधूनमधून दोन्ही समर्थकांमध्ये वाद विवादही घडले होते. बुधवारी या खटल्याचा निकाल असल्याने पुन्हा तशी स्थिती होण्याची शक्यता होती. यामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. प्रवेशद्वारावर एकाही गटाच्या समर्थकाला प्रवेश मिळणार नाही याची व्यवस्था केली.
या खटल्यातील साक्षीदार फितुर झाले. पंचांनी पोलीस यंत्रणेने आपल्यासमक्ष हत्यारे हस्तगत केली नसल्याचे सांगितले. संशयितांविरुद्ध सबळ पुरावे आढळले नाही, या गुन्ह्यातील तक्रारदाराच्या जबाबात विसंगती आढळून आली. पोलीस ठाण्यात तक्रार देताना रामदास चांगलेने आपण घटनास्थळी हजर असल्याचे म्हटले होते. परंतु, घटना घडली तेव्हा हॉटेल मालकाच्या नातेवाईकाने संबंधिताला दूरध्वनीद्वारे माहिती दिली होती. त्यानंतर तो घटनास्थळी पोहोचल्याचे निदर्शनास आले. या मुद्यावरून न्यायालयाने संशयितांची सबळ पुरावे नसल्याने मुक्तता केली. दरम्यान, मोहन चांगलेच्या हत्येनंतर त्याच्या टोळीवर काही महिन्यात पगारे टोळीतील गुंड भीम पगारेची हत्या केल्याचा आरोप आहे. पगारे हत्या प्रकरणात उपरोक्त प्रकरणातील चांगलेचा भाऊ संशयित आहे.

mumbai high court gang rape marathi news
गंभीर स्वरूपाच्या खटल्यांना विलंब हा जामिनाचा आधार नाही, सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन नाकारताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण
Prime Minister Narendra Modi slams congress over development
‘मोदींची गॅरंटी’ म्हणजे क्षणाक्षणाची मेहनत! वर्ध्यात नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
Narayan Rane case, Vinayak Raut, Parab,
२००५ नारायण राणेंच्या सभेतील गोंधळाचे प्रकरण : विनायक राऊत, परब, सावंत, देसाई, रवींद्र वायकर यांची निर्दोष सुटका
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा