डोंबिवलीतील सावरकर रस्त्यावरील डॉ. आंबेडकर नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील १५ घुसखोरांना घरातून बाहेर काढण्याची कारवाई महापालिका अधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी केली. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे घुसखोरांचे धाबे दणाणले. पोलीस बंदोबस्त असल्याने घुसखोरांनी कारवाईला विरोध केला नाही.
‘झोपु’ योजनेतील तळमजल्याला असलेले २३ व्यापारी गाळे तसेच १५ घुसखोरांच्या घरांना महापालिका अधिकाऱ्यांनी सील ठोकले. महापालिकेचे मालमत्ता विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रकाश ढोले, प्रभाग अधिकारी विनायक देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ‘झोपु’ योजनेतील गैरप्रकारांची एक याचिका सध्या उच्च न्यायालयात सुनावणीला आली आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिकेने ही कारवाई केल्याचे बोलले जाते.
महापालिका अधिकारी गुरुवारी दुपारी सावरकर मार्गावरील डॉ. आंबेडकर नगर झोपु योजनेतील वसाहतीत आले. घरातील काही रहिवाशांकडे महापालिकेने लाभार्थी म्हणून दिलेल्या कागदपत्रांची मागणी केली. १५ घुसखोर महापालिकेची कागदपत्रे दाखवू शकले नाहीत. त्यांना तातडीने घरातून सामानासह बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले. कोणताही विरोध न करता घुसखोरांनी घरे खाली करून दिली, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. आंबेडकर नगर झोपु योजनेत ३०५ सदनिका आहेत. त्यामधील २१५ जण प्रत्यक्ष लाभार्थी आहेत. उर्वरित ९० सदनिकांमध्ये घुसखोर घुसल्याचा तक्रारदाराचा दावा आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते दीड वर्षांपूर्वी या प्रकल्पाचे घाईघाईने उद््घाटन करण्यात आले होते. त्यानंतर या योजनेतील गैरप्रकारांची उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेत गैरप्रकार झाल्याचा संशय असून या प्रकरणाची सी.बी.आय. चौकशीची गरज असल्याचे पोलीस आयुक्तांच्या अहवालात म्हटले आहे.

demolishing building , citizens, Nandivali, dombivli, trouble of dust
Video : डोंबिवलीत नांदिवलीत रहिवासी, प्रवासी धुळीच्या लोटांनी हैराण; पुनर्विकासासाठी इमारत तोडताना नियम धाब्यावर
trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा