भारतीय मजदूर संघ संलग्नित बीएसएनएलमध्ये कार्यरत संघटना भारतीय टोलिकॉम एम्प्लॉईज युनियनने बीएसएनएल व्यवस्थापनाची मनमानी व श्रमिक हिताविरोधी कार्यशैलीच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात भारतीय टेलिकॉम एम्प्लॉईज युनियनने  कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत बीएसएनएल व्यवस्थापनाला निवेदन दिले. तसेच याबाबत चर्चा करण्यासाठी वेळ मागितला. मात्र व्यवस्थापनाकडून कोणत्याच प्रकारचे उत्तर मिळाले नाही व समस्या सोडवण्याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही. बीएसएनएलचे वरिष्ठ महाव्यवस्थापक आर. एन. पटेल यांना नोटीस देऊन २९ मे रोजी मधल्या सुटीत धरणे देण्याचा निर्णय घेतला आहे.
या आंदोलनानंतर तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा जिल्हा सचिव प्रशांत गडकरी यांनी दिला. या आंदोलनात सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन सचिव डी.एस. डहारे, जिल्हा अध्यक्ष सुरेश सोनकुसरे, परिमंडळ कोषाध्यक्ष जी.पी. गुल्हाणे, जिल्हा सहसचिव संजय बुल्ले, वसंत देवठाकळे यांनी केले.