जिल्हयात कर्मचाऱ्यांना शासन आदेशान्वये वेळीच वेतन अदा करून मासिक वेतन पत्रिका मिळावी, जिल्हयात आदिवासी भागातील कर्मचाऱ्यांना एकस्तर योजना लागू करावी, आदी प्रलंबित मागण्यांसाठी नाशिक जिल्हा हिवताप कर्मचारी संघटना व कास्ट्राईब बहुउद्देशिय आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्यावतीने गुरूवारी राज्य कामगार विमा दवाखान्यासमोर लाक्षणिक उपोषणे करण्यात आले. आपल्या मागण्यांचे निवेदन कर्मचारी संघटनेने जिल्हा हिवताप अधिकारी व पालकमंत्री छगन भुजबळ यांना दिली आहेत. वारंवार निवेदने देऊनही याबाबत कोणतीही कारवाई होत नसल्याने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी बारा व चोवीस वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्याला कालबध्द पदोन्नती मिळावी, सध्या बंद केलेला फिरती भत्ता प्राधान्यपूर्वक सुरू करावा, शहरी भागासह जिल्हयातील कर्मचाऱ्यांकडे दोनपेक्षा अधिक अतिरीक्त कार्यभार सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यास अधिक वेतन व भत्ते अदा करावेत,  शहरी भागातील कर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता बिले मिळावे, याबाबत तसेच मूळ सेवा पुस्तकात मराठी, हिंदूी भाषेत नोंद व्हावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.