जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधत विविध सामाजिक संस्था, सरकारी रुग्णालये, विद्यालयातून एड्स बाबत जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. फेरीसह एड्सग्रस्त बालकांसाठी विशेष कार्यक्रम झाले.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक यांच्यातर्फे सोमवारपासून जागतिक एड्स नियंत्रण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त जिल्हा रुग्णालयाच्या आवारातून फेरी काढण्यात आली. त्र्यंबकनाका, खडकाळी सिग्नल, शालिमार, एम.जी. रोड, मेहेर सिग्नल आणि सीबीएस या मार्गाने फेरी पुन्हा रुग्णालयात आली. यानंतर रुग्णालयाच्या परिचारिका प्रशिक्षण केंद्रात मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युवक व एच.आय.व्ही. ग्रस्तासांठी सेवा सुविधा, एचआयव्ही व सकारात्मक जीवनशैली, एचआयव्हीचा देशाच्या विकासावर होणारा परिणाम आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली. जिल्हास्तरावर आठ महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी दोन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागात पपेट शो, कटपुतली, एचआयव्ही एड्स माहितीपट कार्यक्रमांचे नियोजन होते.
जी. डी. सावंत महाविद्यालयात एड्स दिनाचे औचित्य साधत राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत फेरी काढण्यात आली. यासाठी यश फाऊंडेशन व महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्राचे सहकार्य लाभले. फेरीचे उद्घाटन प्राचार्य डॉ. ए. डी. बांदल, महिंद्रचे समन्वयक प्रशांत पंडिक, जितेंद्र कामठीकर, यश फाऊंडेशनचे रवंीद्र पाटील, रासेयोचे समन्वयक प्रा. एम. डी. शेंडगे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. यू. बी. पवार यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. फेरीत उपस्थितांनी एड्स शिक्षण जीवनाचे रक्षण, लेकर ए खाए कसम एड्स को रोकेंगे हम, एचआयव्हीचे ज्ञान वाचवी जान आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये व भित्तीपत्रकाच्या माध्यमातून जनजागृती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवार यांनी केले. शेंडगे यांनी आभार मानले.
इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्यावतीने विविध परिचारिका महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थीसाठी एड्स विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्यात आरोग्य सेवा केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा औंधकर यांनी मार्गदर्शन केले. ‘गेटींग टू झिरो’ या संकल्पनेनुसार एचआयव्हीची नवीन लागण, एड्स संबंधित आजार आणि रुग्णांशी होणारा भेदभाव शून्यावर आणणे आवश्यक आहे. या क्रमाने गेल्यास २०३० पर्यंत एड्साला जगातून हद्दपार करणे अवघड नाही. त्यासाठी प्रत्यक्ष रुग्ण, तरूणाई, वैद्यकीय शाखा आणि प्रशासन यांच्यात संवाद असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी मेजर पी. एम. भगत उपस्थित होते. सिडको येथील कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे महाविद्यालयात जिमखाना विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी. व स्काऊट गाईड यांच्यातर्फे एड्स जनजागृती फेरी झाली. यावेळी एड्सबाबत माहिती पत्रके वाटण्यात आली. प्राचार्य वाघ यांनी एड्स आजाराविषयी मार्गदर्शन केले. डॉ. जे. पी. जाधव यांनी एड्सविषयी समज, गैरसमज याची माहिती सांगून रुग्णांना माणुसकीची वागणूक देण्याची गरज व्यक्त केली. योग्य उपचार, व्यायाम, आहार यामुळे रुग्णांचे आरोग्य संतुलित राहु शकते असे त्यांनी सांगितले. फेरीत एड्स विषयी घोषवाक्य, पथनाटय़ सादर करून प्रबोधन करण्यात आले.
दरम्यान, यश फाऊंडेशनच्या सहकार्याने शहरातील १८ शाळा व महाविद्यालयांमध्ये एड्स जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. फेरीत शहरातील १० ते १५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सिडको, पंचवटी, सातपूर, गंगापुर रोड, मखमलाबाद आदी परिसरातून फेरी काढण्यात आली. एचआयव्ही जनप्रबोधनासाठी रेड रिबन क्लबची स्थापना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये करण्यात आली आहे.
सप्ताहात मां-बेटी मेळावा, एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या राज्यातील सर्व बांधव व भगिनींसाठी ‘मंगल मैत्री मेळावा’ व वधू-वर मेळावा, एचआयव्ही एड्स पोस्टर स्पर्धा, संपुर्ण शहर परिसरात पथनाटय़ सादरीकरण करण्यात येणार आहे.

shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
3000 Women in Akola, Read Constitution s Preamble, 75 thousand times, Amrit Jubilee Year, 75 year of indian constition, akola news, indian constitution news, indian constitution reading, 3000 Women reading constitution,
अकोला : तीन हजार महिलांकडून ७५ हजार वेळा संविधान प्रस्तावनेचे वाचन
Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
Nashik Education Department, Steps Up Efforts, Increase Voter, Turnout Through SVEEP Initiative, Systematic Voters Education and Electoral Participation program, students,
उन्हाळी सुट्टीतही एसव्हीईईपी उपक्रमासाठी धडपड