अक्षरधारा आयोजित ४६१ वा मायमराठी शब्दोत्सव राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे २ नोव्हेंबरपासून सुरू  झाले आहे. अक्षरधाराच्या या मायमराठी शब्दोत्सवात भव्य असे भेट पुस्तकाचे दालन उभारले आहे.  या पुस्तकांवर २० टक्के सुट देण्यात येणार असल्याची माहिती अक्षरधाराचे व्यवस्थापक रामदास राठिवडेकर यांनी दिली. याशिवाय १ पुस्तक विकत, १ पुस्तक मोफत अशी वाचकप्रिय योजनाही उत्स्फूर्त प्रतिसादात सुरू आहे. राजहंस ६० पुस्तकांवर ३० टक्के सवलत मायमराठी शब्दोत्सवात आहे. अक्षरधाराचे हे प्रदर्शन १९ नोव्हेंबर २०१२ पर्यंत सकाळी १० ते रात्री ९ यावेळेत दिवसभर सुरू असेल.