कोलकोता येथे २५ जानेवारी रोजी होणाऱ्या ‘ऑल बंगाल म्युझिक कॉन्फरन्स’मध्ये अंजली कीर्तने यांनी तयार केलेल्या दोन लघुपटांची निवड करण्यात आली आहे. ‘थोर लेखिका दुर्गाबाईभागवत’ आणि ‘संगीताचे सुवर्णयुग व गानयोगी- पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुस्कर’ हे तो दोन लघुपट आहेत.
हे दोन्ही लघुपट मराठीसह हिंदी आणि इंग्रजीत तयार करण्यात आले आहेत.
हे लघुपट मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, पुणे, ग्वाल्हेर, बंगलोर, भोपाळ, लखनौ, कानपूर, पणजी, बेळगाव, दिल्ली या शहरातून दाखविण्यात आले आहेत. थोर व्यक्तींची चरित्रे पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आणि संस्कृतीचे जतन करणे या उद्देशाने कीर्तने यांनी लघुचित्रपटनिर्मितीचे काम हाती घेतले आहे.