जोगेश्वरी (पूर्व) येथील ‘अस्मिता’ संस्थेच्या जमनाधर अग्रवाल माध्यमिक विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक अनंत पाटील यांना २०१३ चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार घोषित झाला आहे. येत्या शिक्षकदिनी, ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील एका शानदार सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
विज्ञान व गणित या विषयांचे विद्यार्थीप्रिय शिक्षक असलेल्या अनंत पाटील यांना आपल्या कार्यकाळात अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अस्मिताच्या जमनाधर अग्रवाल विद्यालयात २७ वर्षे सेवा करून ते यंदा मे महिन्यात सेवानिवृत्त झाले. हा राष्ट्रीय पुरस्कार २५ हजार रुपये रोख, रौप्यपदक व मानपत्र अशा स्वरूपाचा आहे. शिक्षकदिनी नवी दिल्लीतील विज्ञानभवनात हा पुरस्कार सोहळा होणार आहे.