मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- ययाति आणि देवयानी
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
* अस्वच्छता तुझे नाव महिला स्वच्छतागृह!
* शोधा म्हणजे सापडेल..
* न्यायालयेही अपवाद नाहीत..
* असून अडचण, नसून खोळंबा!
* महिलांसाठी एकही स्वतंत्र स्वच्छतागृह नाही!
कोणतीही संस्था, इमारत, वस्ती, शहर यांचा सांस्कृतिक निर्देशांक तेथील स्वच्छतालयांवरून, त्यातही महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांवरून ठरतो. वास्तविक स्वच्छ, सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृहे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. महिलांवरील विनयभंग, बलात्कार, छळवणूक आदी गुन्ह्यांची मोठी चर्चा होते, त्याविरुद्ध आंदोलने होतात, कायदे बदलण्यासाठी मोहिमा आखल्या जातात. परंतु मुंबईसारख्या सुमारे अडीच कोटी वस्तीच्या महानगर परिसरात चरितार्थासाठी दिवसभर बाहेर राहणाऱ्या महिलांसाठी एकही स्वतंत्र स्वच्छतागृह असू नये हे आपल्या समाजाबद्दल आणि आपल्या दृष्टिकोनाबद्दल सारे काही सांगून जाते. चार तासांत स्वच्छतागृहाचा आसरा घेतलेला नसताना बसच्या रांगेत उभे राहणे अथवा स्थानकावरील 'नरकपुरीत' जाणे अशक्य असल्याने 'घरीच जाऊ' असा विचार करून प्रवासाला सुरुवात केल्यानंतर जीव घुसमटवणाऱ्या लोकलच्या गर्दीत गुदमरणे म्हणजे काय असते, हे 'जावे त्यांच्या वंशा' तेव्हा कळते. सोमवारीच मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला. एक तृतियांशहून अधिक महिला नगरसेवक असूनही या महापालिकेने महिला स्वच्छतागृहांसाठी एक पैशाचीही तरतूद केलेली नाही. मुंबईतील महिला स्वच्छतागृहांचा घेतलेला लेखाजोखा आतील पानात..
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















