मुंबईतील विविध बसमार्गावरील प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन बेस्ट प्रशासनाने शनिवारपासूनच काही बसमार्गामध्ये बदल करण्याचे ठरवले आहे. या बदलानुसार काही नवीन बसमार्ग चालू करण्यात येणार असून काहींचा मार्गविस्तार होणार आहे. तसेच अत्यल्प प्रतिसाद असलेले काही बसमार्ग रद्द करण्यात आले आहेत. बसमार्गामधील बदल खालीलप्रमाणे
नवीन बसमार्ग
मार्ग क्रमांक १५७ – ग्रँटरोड रेल्वे स्थानक (पश्चिम)-कंबाला हिल टपाल कार्यालय-ग्रँटरोड रेल्वे स्थानक (पश्चिम) वर्तुळाकार सेवा. पहिली बस – सकाळी ७.०५ वा. आणि शेवटची बस – रात्री १०.०० वा. दर दहा मिनिटांनी फेऱ्या.
मार्ग – ग्रँटरोड रेल्वे स्थानक-नाना चौक-ऑगस्ट क्रांती मैदान-डॉ. गोपाळराव देशमुख मार्ग (पेडर रोड)-जसलोक रुग्णालय-वत्सलाबाई देसाई चौक (हाजीअली)-पं. मदनमोहन मालवीय मार्ग-वसंतराव नाईक चौक-जावजी दादाजी मार्ग-भाटिया रुग्णालय-तुकाराम जावजी मार्ग-नोशिर भरुचा मार्ग-ग्रँटरोड रेल्वे स्थानक.
मार्ग क्रमांक ४३६ – गोरेगाव स्थानक पूर्व-नागरी निवारा परिषद-गोरेगाव स्थानक पूर्व वर्तुळाकार सेवा. पहिली बस – सकाळी ६.२५ वा. आणि शेवटची बस रात्री १०.०० वा. दर १५ मिनिटांनी फेऱ्या.
मार्ग – गोरेगाव स्थानक पूर्व-गोरेगाव चेकनाका-साईबाबा संकुल-दूरदर्शन वसाहत-रॅन इंटरनॅशनल स्कूल-हनुमान नगर-वाघेश्वरी मंदिर-सामना परिवार-संकल्प सोसायटी-इन्फिनिटी आयटी पार्क-नागरी निवारा क्रमांक १ व २-महापालिका वसाहत-हनुमान नगर-रॅन इंटरनॅशनल स्कूल-दूरदर्शन वसाहत-साईबाबा संकुल-गोरेगाव चेकनाका-गोरेगाव स्थानक.
मार्ग क्रमांक ६३४ – दामूनगर बसस्थानक ते मालाड आगार. पहिली बस- दामूनगर बसस्थानक येथून सकाळी ७.१५ वा. आणि मालाड आगार येथून सकाळी ६.३५ वा. शेवटची बस- दामूनगर बसस्थानक येथून रात्री ९.४५ वा. आणि मालाड आगार येथून रात्री ९.०० वा. दर २५ मिनिटांनी फेऱ्या उपलब्ध.
मार्ग – दामूनगर बसस्थानक, मालाड पूर्व-अनिता नगर-अलका नगर-क्रांती नगर-गांधी नगर-कुरार गाव-पुष्पा पार्क-मालाड स्थानक-चोक्सी रुग्णालय-ऑर्लेम चर्च-मिठी चौकी-लिंक रोड-मालाड आगार.
मार्ग क्रमांक ६७८ – मानखुर्द स्थानक पश्चिम ते नानावाडी (मेराज मशीद). पहिली बस- मानखुर्द स्थानक येथून सकाळी ६.१० वा. आणि नानावाडी येथून सकाळी ६.०० वा. शेवटची बस- मानखुर्द स्थानक येथून रात्री १०.१० वाजता आणि नानावाडी येथून रात्री १०.०० वा. दर १२ मिनिटांनी फेऱ्या उपलब्ध.
मार्ग – मानखुर्द स्थानक, पश्चिम-विठ्ठल नारायण पुरव मार्ग-चिता कॅम्प-नानावाडी.
बसमार्गाचा विस्तार
मार्ग क्रमांक ८४ मर्या. – पं. पलुस्कर चौक (ऑपेरा हाउस) ते अंधेरी स्थानक पश्चिम हा मार्ग आता सोमवार ते शनिवार हुतात्मा चौक ते अंधेरी स्थानक पश्चिम असा चालवला जाईल.
मार्ग क्रमांक २९३ – बोरिवली स्थानक पूर्व ते जगरदेव कंपाउंड हा मार्ग आता बोरिवली स्थानकापासून कस्तुरबा मार्ग क्रमांक १, टाटा स्पेशल स्टील मार्ग, मागाठाणे आगार या मार्गे जय महाराष्ट्र नगपर्यंत चालवला जाईल.
मार्ग क्रमांक ४६३ – वरळी आगार ते चेंबूर वसाहत हा मार्ग आता रामकृष्ण चेंबूरकर मार्गावरून एमएमआरडीए-वाशीनाका वसाहत इथपर्यंत चालवला जाईल.
वातानुकूलित मार्ग क्रमांक एएस-९ – डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते घाटकोपर रेल्वे स्थानक पूर्व या दरम्यानचा हा मार्ग आता घाटकोपर आगारापर्यंत विस्तारित करण्यात आला आहे.
रद्द झालेले बसमार्ग
मार्ग क्रमांक ६१५ – सांताक्रूझ स्थानक पूर्व ते धारावी आगार.
वातानुकूलित मार्ग क्रमांक एएस- ५२५ – दिंडोशी बसस्थानक ते मिलेनिअम बिझनेस पार्क.