गांधीनगर येथे झालेल्या बाराव्या आंतरराष्ट्रीय म्युनिसिपालिका परिसंवाद व प्रदर्शनामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांची माहिती देणाऱ्या दालनाला ‘द बेस्ट सिटी पॅव्हिलिअन’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
नागरी सेवा-सुविधा जागृती विशेषत: ‘स्वच्छ मुंबई अभियान’ आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पालिकेने विविध सेवांमध्ये घेतलेली ‘स्मार्ट झेप’ यावर विशेष भर देऊन दालनाची उभारणी करण्यात आली होती.
आरोग्य विभाग, सामाजिक कल्याण, उद्याने व मैदाने, शिक्षण विभाग, पाणीपुरवठा व्यवस्थापन, पर्जन्य जलवाहिन्या, रस्ते आणि पूल, घनकचरा व्यवस्थापन तसेच जुन्या मुंबईची छायाचित्रांची मांडणी करून विविध कार्याची माहिती देणारी चित्रफीत दाखवण्यात येत होती. या दालनाची संकल्पना, उभारणी व व्यवस्थापन यात आयुक्त सीताराम कुंटे यांचा प्रमुख सहभाग होता. जनसंपर्क विभागाचे प्रमुख विजय खबाले-पाटील यांनी पालिकेच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.