काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत तरुणांना उतरविण्याचे ठरविले असल्यामुळे आपण लोकसभेच्या िरगणात उतरण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे मत पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केले.
उस्मानाबाद मतदारसंघातून चाकूरकर मैदानात उतरतील, अशी चर्चा होत आहे. या पाश्र्वभूमीवर मंगळवारी रांजणी येथील नॅचरल शुगर कारखान्यावर पत्रकारांनी थेट चाकूरकरांना विचारणा केली. त्या वेळी ते बोलत होते. काँग्रेसने या वेळी तरुणांना प्राधान्य देण्याचा विचार सुरू केला आहे. याबाबत पक्षातर्फे ठोस निर्णय झाला नसला, तरी पक्षाचे नियोजन त्या पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे मी लोकसभेला उमेदवारी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले, मात्र या स्पष्टीकरणानंतरही चाकूरकर उस्मानाबाद मतदारसंघातून उमेदवार असतील, असा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत. त्यामुळे चच्रेला उधाण आले आहे.