मूषक आणि झुरळांचा सुळसुळाट, दूषित पिण्याचे पाणी, उपाहारगृहाचा अभाव, माहिती तंत्रज्ञानविषयक अपुऱ्या सुविधा, अधूनमधून बंद पडणारी वातानुकूलित यंत्रणा, हवा खेळती राहावी यासाठी नसलेली सुविधा, अशा अनेक समस्यांनी वरळी येथील पालिकेच्या इंजिनीअरिंग हबमधील अभियंते आणि इतर कर्मचारी त्रस्त झाले आहेत. आज ना उद्या सेवा-सुविधा उपलब्ध होतील, या आशेपोटी ही मंडळी इंजिनीअरिंग हबमध्ये काम करीत होती. परंतु आता असह्य़ झाल्यामुळे बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनीअर्स युनियनने या प्रश्नाला वाचा फोडली असून, दस्तुरखुद्द आयुक्तांना पत्र पाठविण्यात आले आहे.
सर्व अभियंते एका छताखाली यावेत या संकल्पनेतून पालिकेने वरळी येथे इंजिनीअरिंग हब उभारले. त्यानंतर हळूहळू पालिकेतील विविध विभागांची कार्यालये इंजिनीअरिंग हबमध्ये हलविण्यात आली. नव्या झकपक इमारतीमध्ये कार्यालय हलविण्यात आल्याने काही अभियंते, अधिकारी, कर्मचारी खूश झाले होते. मात्र थेट कार्यालयात पोहोचण्यासाठी द्राविडी प्राणायाम घडू लागल्याने काही दिवसांतच ही मंडळी कंटाळली. सुरुवातीला या इमारतीमध्ये उत्तम वातानुकूलित यंत्रणा होती. कार्यालयात पोहोचण्यासाठी त्रास होत असला तरी तेथील वातानुकूलित यंत्रणेमुळे दिलासा मिळत होता. परंतु गेल्या काही महिन्यांपासून वातानुकूलित यंत्रणा बंद पडू लागली आहे. तसेच वायुविजनाची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी हैराण झाले आहेत. इंजिनीअरिंग हबमध्ये उपाहारगृहाची व्यवस्था नसल्यामुळे या मंडळींना आसपासच्या हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता अथवा भोजन करावे लागते. पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नाही. कार्यालयांमध्ये वॉटर फिल्टर बसविले असले तरी त्यांची स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे दूषित पाणी पिऊन काही जण आजारी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. इंजिनीअरिंग हबमध्ये कामासाठी आवश्यक असलेल्या माहिती आणि तंत्रज्ञानविषयक सुविधाही अपुऱ्या असून मोबाइलचे नेटवर्कही मिळत नाही. झेरॉक्स मशीनचा तुटवडा असल्याने कामात अडचणी निर्माण होतात. प्रसंगी महत्त्वाच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स काढण्यासाठी शिपायाला कार्यालयाबाहेर पाठवावे लागते. त्यामुळे कार्यालयात कामाचा खोळंबा होतो.
इंजिनीअरिंग हबमध्ये मूषक आणि झुरळांचा सुळसुळाट झाला आहे. मूषकांचा तर कार्यालयामध्ये स्वैरसंचार सुरू असतो. त्यांच्यापासून वीजपुरवठय़ाच्या वायरला धोका असून शॉर्टसर्किट होण्याच्या शक्यतेने कर्मचारी धास्तावले आहेत. कार्यालयांतील प्रसाधनगृहांचीही आवश्यक ती स्वच्छता केली जात नाही. एकंदर असुविधांमुळे इंजिनीअरिंग हबमधील अभियंते, अधिकारी, कर्मचारी त्रस्त झाले आहेत. कार्यालयाची देखभाल करणाऱ्या संबंधित विभागाकडे या संदर्भात अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, परंतु परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. या प्रकारांची बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशनने दखल घेतली असून, असोसिएशनने थेट पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्र पाठविले आहे. अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या या समस्या तातडीने सोडवाव्यात, असे गाऱ्हाणे असोसिएशनचे सरचिटणीस साईनाथ राजाध्यक्ष यांनी आयुक्तांना घातले आहे.मूषक आणि झुरळांचा सुळसुळाट, दूषित पिण्याचे पाणी, उपाहारगृहाचा अभाव, माहिती तंत्रज्ञानविषयक अपुऱ्या सुविधा, अधूनमधून बंद पडणारी वातानुकूलित यंत्रणा, हवा खेळती राहावी यासाठी नसलेली सुविधा, अशा अनेक समस्यांनी वरळी येथील पालिकेच्या इंजिनीअरिंग हबमधील अभियंते आणि इतर कर्मचारी त्रस्त झाले आहेत. आज ना उद्या सेवा-सुविधा उपलब्ध होतील, या आशेपोटी ही मंडळी इंजिनीअरिंग हबमध्ये काम करीत होती. परंतु आता असह्य़ झाल्यामुळे बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनीअर्स युनियनने या प्रश्नाला वाचा फोडली असून, दस्तुरखुद्द आयुक्तांना पत्र पाठविण्यात आले आहे.
सर्व अभियंते एका छताखाली यावेत या संकल्पनेतून पालिकेने वरळी येथे इंजिनीअरिंग हब उभारले. त्यानंतर हळूहळू पालिकेतील विविध विभागांची कार्यालये इंजिनीअरिंग हबमध्ये हलविण्यात आली. नव्या झकपक इमारतीमध्ये कार्यालय हलविण्यात आल्याने काही अभियंते, अधिकारी, कर्मचारी खूश झाले होते. मात्र थेट कार्यालयात पोहोचण्यासाठी द्राविडी प्राणायाम घडू लागल्याने काही दिवसांतच ही मंडळी कंटाळली. सुरुवातीला या इमारतीमध्ये उत्तम वातानुकूलित यंत्रणा होती. कार्यालयात पोहोचण्यासाठी त्रास होत असला तरी तेथील वातानुकूलित यंत्रणेमुळे दिलासा मिळत होता. परंतु गेल्या काही महिन्यांपासून वातानुकूलित यंत्रणा बंद पडू लागली आहे. तसेच वायुविजनाची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी हैराण झाले आहेत. इंजिनीअरिंग हबमध्ये उपाहारगृहाची व्यवस्था नसल्यामुळे या मंडळींना आसपासच्या हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता अथवा भोजन करावे लागते. पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नाही. कार्यालयांमध्ये वॉटर फिल्टर बसविले असले तरी त्यांची स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे दूषित पाणी पिऊन काही जण आजारी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. इंजिनीअरिंग हबमध्ये कामासाठी आवश्यक असलेल्या माहिती आणि तंत्रज्ञानविषयक सुविधाही अपुऱ्या असून मोबाइलचे नेटवर्कही मिळत नाही. झेरॉक्स मशीनचा तुटवडा असल्याने कामात अडचणी निर्माण होतात. प्रसंगी महत्त्वाच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स काढण्यासाठी शिपायाला कार्यालयाबाहेर पाठवावे लागते. त्यामुळे कार्यालयात कामाचा खोळंबा होतो.
इंजिनीअरिंग हबमध्ये मूषक आणि झुरळांचा सुळसुळाट झाला आहे. मूषकांचा तर कार्यालयामध्ये स्वैरसंचार सुरू असतो. त्यांच्यापासून वीजपुरवठय़ाच्या वायरला धोका असून शॉर्टसर्किट होण्याच्या शक्यतेने कर्मचारी धास्तावले आहेत. कार्यालयांतील प्रसाधनगृहांचीही आवश्यक ती स्वच्छता केली जात नाही. एकंदर असुविधांमुळे इंजिनीअरिंग हबमधील अभियंते, अधिकारी, कर्मचारी त्रस्त झाले आहेत. कार्यालयाची देखभाल करणाऱ्या संबंधित विभागाकडे या संदर्भात अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, परंतु परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. या प्रकारांची बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशनने दखल घेतली असून, असोसिएशनने थेट पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्र पाठविले आहे. अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या या समस्या तातडीने सोडवाव्यात, असे गाऱ्हाणे असोसिएशनचे सरचिटणीस साईनाथ राजाध्यक्ष यांनी आयुक्तांना घातले आहे.