रोजगाराच्या निमित्ताने दररोज मुंबईत थडकणाऱ्या परप्रांतियांच्या लोंढय़ांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर मुंबईतून गायब होणाऱ्या, म्हणजेच बेपत्ता नागरिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांकडील आकडेवारीनुसार मुंबईतून दररोज सुमारे २७ जण बेपत्ता होत आहेत. २०१२ मध्ये आतापर्यंत मुंबईत ९४६८ जण बेपत्ता झाले असून त्यापैकी ६१२३ जणांचा शोध लागला आहे. मात्र अद्यापही सुमारे साडेतीन हजार जण बेपत्ताच आहेत.
 देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिक रोजगारासाठी मुंबईत येत असतात. दररोज त्यात भर पडत आहे. त्याचबरोबर मुंबईतून बेपत्ता होणाऱ्या लोकांची संख्याही वाढत असल्याचे आढळून येत आहे, असे ‘मिसिंग पर्सन ब्युरो’चे पोलीस उपायुक्त आनंद मांडय़ा यांनी सांगितले. अनेक कारणांमुळे नागरिक बेपत्ता होतात. त्यात अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश अधिक आहे. पत्ता चुकणे, मानसिक संतुलन बिघडणे, रागावून घर सोडणे, फसवून दुसरीकडे नेणे आदी कारणे त्यामागे आहेत. तर अल्पवयीन मुला-मुलींना फूस लावून पळवून नेणे, अपहण करणे आदी कारणांचाही त्यात समावेश आहे. प्रेमप्रकरणात मुले घर सोडून जाणाऱ्यांचाही त्यातच समावश केला जातो. चालू वर्षांत (नोव्हेंबपर्यंत) मुंबईत एकूण ९,४६८ जण बेपत्ता झाले होते. त्यापैकी ६,१२३ जणांचा शोध लागला. मात्र त्यापैकी साडेतीन हजार जणांचा शोध अद्यापही सुरू आहे, असे मांडय़ा यांनी सांगितले
उच्च न्यायालयात नुकतीच एक याचिका दाखल झाली होती. त्यात बेपत्ता नागरिकांबद्दल माहिती विचारून त्यांना शोधण्याचे आवाहन करण्यात आले होते. न्यायालायच्या आदेशामुळे सर्व पोलीस ठाण्यांना बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लवकरच बेपत्ता असलेले अनेक जण सापडतील, असा आशावाद मांडय़ा यांनी व्यक्त केला. या संदर्भात सध्या मुबईतील ९२ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचे एक शिबीर पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.    

                बेपत्ता     सापडलेले
मुले         १३६२      १०६०
मुली        १६६२     ११८६
पुरुष       ३०८१      १८६७
महिला   ३३५३     २०१०

जानेवारी २००५ ते डिसेंबर २०११
एकूण बेपत्ता -८०, ०६८
सापडले- ७०, २५९
अद्याप बेपत्ता -१०, ०७०

daily 29 people are missing from mumbai
crime, missing, police
मुंबईतून दररोज २७ जण बेपत्ता होतात  
अद्याप साडेतीन हजार जण गायब
  प्रतिनिधी
रोजगाराच्या निमित्ताने दररोज मुंबईत थडकणाऱ्या परप्रांतियांच्या लोंढय़ांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर मुंबईतून गायब होणाऱ्या, म्हणजेच बेपत्ता नागरिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांकडील आकडेवारीनुसार मुंबईतून दररोज सुमारे २७ जण बेपत्ता होत आहेत. २०१२ मध्ये आतापर्यंत मुंबईत ९४६८ जण बेपत्ता झाले असून त्यापैकी ६१२३ जणांचा शोध लागला आहे. मात्र अद्यापही सुमारे साडेतीन हजार जण बेपत्ताच आहेत.
 देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिक रोजगारासाठी मुंबईत येत असतात. दररोज त्यात भर पडत आहे. त्याचबरोबर मुंबईतून बेपत्ता होणाऱ्या लोकांची संख्याही वाढत असल्याचे आढळून येत आहे, असे ‘मिसिंग पर्सन ब्युरो’चे पोलीस उपायुक्त आनंद मांडय़ा यांनी सांगितले. अनेक कारणांमुळे नागरिक बेपत्ता होतात. त्यात अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश अधिक आहे. पत्ता चुकणे, मानसिक संतुलन बिघडणे, रागावून घर सोडणे, फसवून दुसरीकडे नेणे आदी कारणे त्यामागे आहेत. तर अल्पवयीन मुला-मुलींना फूस लावून पळवून नेणे, अपहण करणे आदी कारणांचाही त्यात समावेश आहे. प्रेमप्रकरणात मुले घर सोडून जाणाऱ्यांचाही त्यातच समावश केला जातो. चालू वर्षांत (नोव्हेंबपर्यंत) मुंबईत एकूण ९,४६८ जण बेपत्ता झाले होते. त्यापैकी ६,१२३ जणांचा शोध लागला. मात्र त्यापैकी साडेतीन हजार जणांचा शोध अद्यापही सुरू आहे, असे मांडय़ा यांनी सांगितले
उच्च न्यायालयात नुकतीच एक याचिका दाखल झाली होती. त्यात बेपत्ता नागरिकांबद्दल माहिती विचारून त्यांना शोधण्याचे आवाहन करण्यात आले होते. न्यायालायच्या आदेशामुळे सर्व पोलीस ठाण्यांना बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लवकरच बेपत्ता असलेले अनेक जण सापडतील, असा आशावाद मांडय़ा यांनी व्यक्त केला. या संदर्भात सध्या मुबईतील ९२ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचे एक शिबीर पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.    

                बेपत्ता     सापडलेले
मुले     १३६२        १०६०
मुली     १६६२     ११८६
पुरुष     ३०८१     १८६७
महिला     ३३५३     २०१०

जानेवारी २००५ ते डिसेंबर २०११
एकूण बेपत्ता ८०, ०६८
सापडले- ७०, २५९
अद्याप बेपत्ता १०, ०७०