लोकसत्ताच्या विदर्भ आवृत्तीचे ‘ब्युरो चीफ’ म्हणून चंद्रपूर येथील लोकसत्ताचे विशेष प्रतिनिधी देवेंद्र गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नक्षलवादी चलवळीचे अभ्यासक असणारे गावंडे सुरुवातीपासूनच लोकसत्तात कार्यरत आहेत. जीवावर उदार होऊन आणि प्रसंगी नक्षलवाद्यांच्या धमक्यांना भीक न घालता त्यांनी वार्ताकन केलेले आहे. वार्ताहर, जिल्हा प्रतिनिधी, विशेष प्रतिनिधी, अशी त्यांची लोकसत्तातील कारकीर्द राहिली आहे. नक्षलवाद या विषयावर त्यांची विविध शहरांमध्ये व्याख्याने झाली असून त्यावरील ‘लोकयात्रा’ आणि साधना प्रकाशनने प्रकाशित केलेले ‘नक्षलवादाचे आव्हान’ ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे वन्यजीवविषयक अभ्यासासाठी त्यांना लोकसत्तातर्फे पाठवण्यात आले होते. अनिलकुमार पत्रकारिता पुरस्कारासह विविध पुरस्कारांचेही ते मानकरी आहेत.
विदर्भातील विविध उपक्रमांशी ते निगडीत आहेत.  

Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
Mahayuti gathering in Washim, Gyayak Patni,
महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन् खुर्चीवरून वाद !
Sudhir Mungantiwar-Kishore Jorgewar reunion Will campaign in the Lok Sabha elections
सुधीर मुनगंटीवार-किशोर जोरगेवार यांचे मनोमिलन; लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार
Chandrapur
चंद्रपूर : जिल्हा बँकेचे अध्यक्ष रावत व आमदार धानोरकर यांच्यात बंदद्वार चर्चा, दोन्ही नेत्यांमध्ये होते राजकीय वितुष्ट