रॅगिंगची कारणे, त्याचे दुष्परिणाम इथपासून रॅगिंगमुळे होणारे नुकसान, रॅगिंग विरोधी कायदा या सर्वाची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण मंडळ आणि येथील कर्मवीर आबासाहेब सोनवणे तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित ‘रॅगिंग प्रतिबंधक’ शिबीरातून विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आली.

शिबीराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. किशोर पवार आणि शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जी. बाविस्कर यांच्या हस्ते झाले. डॉ. पवार यांनी प्रत्येक महाविद्यालयात रॅगिंगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. रॅगिंगमुळे विद्यार्थी कोणत्याही टोकाला पोहचतात. प्रसंगी स्वत:सह इतरांचे आयुष्य बरबाद करतात. रॅिगंग झालेल्या विद्यार्थ्यांचे आयुष्य कसे उद्ध्वस्त झाले आहे, याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली. विद्यार्थी कल्याण मंडळ प्रमुख डॉ. बी. आर. पवार यांनी मनोगतातून शिबीराचा हेतू स्पष्ट केला. शिबीराच्या पहिल्या सत्रात अ‍ॅड. किरण देवरे यांनी ‘१९९९ चा रॅगिंग प्रतिबंधक कायदा’ या विषयावर मार्गदर्शन केले. रॅगिंगचा अर्थ, रॅगिंग कोणकोणत्या प्रकारे केले जाते, रॅगिंग झाल्यास कोणाकडे तक्रार करावी, रॅगिंग केल्यास होणारी शिक्षा याबाबत माहिती दिली. रॅगिंगमुळे विद्यार्थ्यांची मानसिकता बिघडून मनात भीती निर्माण होते. यामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली असल्याने रॅगिंगला प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याचे अ‍ॅड. देवरे यांनी नमूद केले.
सत्रातील दुसऱ्या व्याख्यानात प्रा. डॉ. बाविस्कर यांनी ‘रॅगिंग व विद्यार्थी’ विषयावर व्याख्यान दिले. रॅगिंग रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी सांघिक प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
शिबीराच्या दुसऱ्या सत्रात प्राचार्य डॉ. पवार यांनी ‘रॅगिंग प्रतिबंधक’ या विषयावर व्याख्यान दिले. घरातील व कुटूंबातील वातावरण बिघडल्यास मुले विचित्र वागतात. गुन्हेगारी प्रवृत्तीकडे खेचले जातात. त्यामुळे त्यांच्यावर सुसंस्कारांचे शिंपण झाले तरच मुले चांगली घडतील. सध्या मोबाईल व इंटरनेटमुळेही रॅगिंगच्या प्रमाणात वाढ होत आहे. यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंग रोखण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रा. टी. बी. खैरनार यांनीही महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्याविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. बी. आर. पवार यांनी केले. आभार प्रा. डी. के. अहिरे यांनी मानले.

Dates of 299 exams of Mumbai University summer session announced Mumbai
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील २९९ परीक्षांच्या तारखा जाहीर; दोन लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षार्थी
Rat tail in student food akola
अकोला : विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात उंदराचे शेपूट! दहा विद्यार्थ्यांना विषबाधा
controversy between vice chancellor and student union
कुलगुरू-विद्यार्थी संघटनांमध्ये वादाचे निखारे; डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला छावणीचे स्वरूप
Nagpur Bench High Court
केवळ घटनास्थळी उपस्थित होते म्हणून… ३६ वर्षांनंतर निर्णय देताना उच्च न्यायालय काय म्हणाले जाणून घ्या

अशोका युनिव्हर्सलमध्ये चर्चासत्र
नाशिक येथील अशोका शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने राज्यस्तरीय आंतरविद्याशाखीय चर्चासत्र झाले. विद्यार्थ्यांमध्ये नितीमत्ता, मूल्ये आणि तत्वे यांची रुजवात या विषयावर हे चर्चासत्र झाले. विद्यापीठाचे शिक्षणशास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे यांनी मूल्य हे चारित्र्य संवर्धन व विकासाचे साधन असून त्याव्दारे समाजाचा सर्वागीण विकास होत असतो, असे नमूद केले. शिक्षक शिक्षण हे समाजाचा सर्वागीण विकास घडविण्यासाठी महत्वाचे आहे. त्यामधून खऱ्या अर्थाने मूल्याचा विकास होत असल्याचे फादर ट्रेव्हर मिरांडा यांनी सांगितले. गरीब समाज शाळेत शिकला तर खऱ्या अर्थाने मूल्यांचा विकास होतो. आदिवासी समाज व समाजातील वंचित घटक देखील यांना शिक्षण मिळणे गरजेचे आहे असे सांगितले. डॉ. दिलीप धोंडगे यांनी नितीतत्वे व मूल्य विकास यामध्ये शिक्षकांची भूमिका या विषयी विविध दाखले दिले. चर्चासत्रास संस्थेचे अध्यक्ष अशोक कटारिया, संस्थेचे संचालक डॉ. नीलेश बेराड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विद्यागौरी जोशी उपस्थित होते.

सिडको महाविद्यालयात राष्ट्रीय कार्यशाळा
सिडको येथील कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. सुनील ढिकले यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याच्या फॉरेन्सिक सायन्सचे संचालक डॉ. मालवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. मालवे यांनी गुन्हे संशोधनात फॉरेन्सिक विज्ञानाला असलेले महत्व मांडले. मानवी जीवनात दैनंदिन उपक्रमात सकाळपासून रात्रीपर्यंत रसायनशास्त्राचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष होणाऱ्या उपयोगाकडे त्यांनी लक्ष वेधले.
नानासाहेब महाले यांनी शेती व्यवसायात वापरण्यात येणाऱ्या औषधांची माहिती दिली. विद्यापीठ प्रतिनिधी अपर्णा पांडे हिने आभार मानले.