दिवाळी दिव्यांचा सण. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीमध्ये सर्वात पहिला नंबर दिव्यांचा लागतो. दारासमोर लावलेली मातीच्या मिणमिणत्या पणत्यांची आरास रांगोळीच्या सौंदर्यात अजूनच भर घालते. गेल्या काही वर्षांपासून मातीच्या पणत्यांची जागा नानारंगी डेकोरेटिव्ह पणत्यांनी घेतली आहे. यंदाही बाजारामध्ये या डेकोरेटिव्ह पणत्यांची रेलचेल दिसून येत आहे.
यंदा बाजारामध्ये प्लास्टिकच्या एलईडी लाइट असलेल्या पणत्यांपासून ते स्टीलच्या पणत्यांपर्यंत विविध प्रकारच्या पणत्या पाहायला मिळत आहेत. नेहमीच्या मातीच्या पणत्यांमध्येही सुंदर पर्याय उपलब्ध आहेत. यंदा खास राजस्थानी पद्धतीच्या मटक्याच्या आकारातील मातीच्या पणत्या प्रामुख्याने पाहायला मिळत आहेत. विविध रंगांतील या पणत्यांवर लावलेल्या काचांमुळे त्या अजूनच मोहक दिसत आहेत. बाजारात सुमारे १० ते १५ रुपयांपासून या प्रकारच्या पणत्या उपलब्ध आहेत. या पणत्यांना पर्याय म्हणून स्टीलच्या पणत्या उपलब्ध आहेत. या पणत्यांना आतल्या बाजूने लाल, हिरव्या, गुलाबी रंगांनी रंगवलेले आहे. यांची किंमत ६० रुपयापासून सुरु होते.
हल्ली कार्यालयांमध्ये किंवा घरातसुद्धा सुरक्षेच्या कारणामुळे तेलाचे दिवे लावण्यापेक्षा मेणाचे किंवा विजेचे नक्षीदार दिवे लावायला अधिक पसंती दिली जात आहे. हे लक्षात घेऊन बाजारात प्लास्टिकचे सप्तरंगी प्रकाशाचे एलईडी लाइट असलेले दिवे पाहायला मिळत आहेत. त्यांची किंमत २५ रुपयांपासून आहे. मद्यचषकाच्या आकारातील प्लास्टिकचे दिवेही यंदा पाहायला मिळत आहेत. या ग्लासमध्ये मेणाचे किंवा विद्युत दिवे ठेवण्याची सोय केलेली आहे. या दिव्यांची किंमत ६० ते ८० रुपयांपर्यंत आहे. कुंदनचे रंगीत खडे वापरून तयार केलेले प्लास्टिकचे दिवे मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही भाव खाऊन जात आहेत. या दिव्यांचा वापर केवळ दिवाळीसाठीच मर्यादित नसून, दिवाळीनंतरसुद्धा घरात शोपीस म्हणून करता येतो, त्यामुळे या दिव्यांवर २०० ते ४०० रुपये खर्च करण्यास ग्राहकांची तयारी असते.  

jewellery police pune
पुणे : रिक्षा प्रवासी महिलेचे सात तोळ्यांचे दागिने गहाळ; पाेलिसांच्या प्रयत्नांमुळे दागिन्यांचा शोध
farmers agitation causes massive traffic jam in nashik city
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नाशिककरांची कोंडी; वन जमिनींच्या प्रश्नावर मंगळवारी मुंबईत बैठक
combative attitude of Sikh community
चाहे हंजूगॅस बरसाओ, या गोळीया… शेतकरी आंदोलनात ‘जट्ट दा जुगाड’
A ten year old girl was molested by two old men
संतापजनक! दोन वृद्धांचा दहा वर्षीय मुलीवर अत्याचार; तीन महिन्यांपासून लैंगिक शोषण