येथील एमआयडीसी इंडस्ट्रियल असोसिएशनसह विविध औद्योगिक संघटनांनी आद्योगिक क्षेत्रावर लादण्यात येणाऱ्या ३५ टक्के दरवाढीच्या निषेधार्थ महावितरण कंपनीच्या येथील विद्युत भवन या कार्यालयासमोर उद्या, २७ फेब्रुवारीला वीज बिलांची होळी करण्याचा निर्णय घेतला आहे.
औद्योगिकदृष्टय़ा मागासलेल्या विदर्भातील उद्योगांना या दरवाढीचा मोठा फटका बसणार असून उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सध्या औद्योगिक क्षेत्र मंदीने ग्रासले असताना महावितरण कंपनीने केलेल्या दरवाढीमुळे उद्योजकांनी झोप उडाली आहे. आधीच महाराष्ट्रातील वीज दर हे इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहेत. हे अवाजवी दर आणखी वाढवण्यात आले आहेत. ही दरवाढ असहनीय असल्याचे एमआयडीसी इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष विजय जाधव व सचिव नीलेश दम्मानी यांचे म्हणणे आहे. महावितरण कंपनीने ४ हजार १७१ कोटींच्या दरवाढीचा प्रस्ताव पुढे केला आहे. प्रत्यक्षात हा प्रस्ताव १० हजार ६२५ कोटी रुपयांच्या दरवाढीचा असल्याचे ग्राहक आणि औद्योगिक संघटनांचे म्हणणे आहे.
राज्यात नोव्हेंबर २०१४ च्या तुलनेत ३०० युनिटच्या आतील सर्वसामान्य घरगुती ग्राहकांवरील दरवाढ स्लॅबनिहाय १७ ते ७१ टक्के असून लघुदाब औद्योगिक ग्राहक आणि यंत्रमागधारकांवरील वाढ १६ ते २४ टक्के आहे. उच्चदाब औद्योगिक ग्राहकांवरील वाढ १६ ते २९ टक्के आहे. शेतकरी ग्राहकांवरील दरवाढ ही ११ ते २३ टक्के  आहे आणि स्थिर आकारातील वाढीची मागणी सरसकट १५ ते २२ टक्के आहे. दोन्ही दरवाढीचा विचार करता घरगुती ग्राहकांची वीजबिले नोव्हेंबर २०१४ च्या तुलनेत दीडपट, तर औद्योगिक ग्राहकांची बिले किमान सव्वापट होतील. उर्वरित राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीजदर हे दीडपट अथवा दुप्पटच राहणार असल्याचे ग्राहक संघटनांचे म्हणणे आहे.

water cut Pune
पुण्यात अघोषित पाणीकपातीला सुरुवात : येत्या बुधवारी ‘या’ भागातील पाणी बंद
Indian seed industry turnover of rs 30 thousand crore
देशातील बियाणे उद्योगाची स्थिती काय? जाणून घ्या. बियाणे उद्योगाची उलाढाल
police commissioner nagpur
चक्क पोलीस आयुक्तांनी पकडला कुख्यात गुंड
Urban Planning Exam marathi news
नगर रचना विभागाची परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी, ‘या’ तारखेला होणार कागदपत्रांची पडताळणी