गेवराई तालुक्यातील रोहितळ येथील पेयजल योजनेच्या कामात कामपुरवठा व स्वच्छता समिती अध्यक्ष, सचिवांनी २३ लाख ५५ हजार ७७६ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तलवाडा पोलिसात समितीचे अध्यक्ष व सचिवांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
रोहितळ गावाला २०११ मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करण्यास विहीर व जलवाहिनीसाठी २५ लाख ५२ हजार ४९० रुपयांचा निधी बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने मंजूर केला. या निधीपकी ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती अध्यक्ष, सचिवाने विहीर खोदण्यास केवळ दोन लाख रुपये खर्च केले व उर्वरित २३ लाख ५५ हजार ७७६ रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी जि. प. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, तसेच गेवराई ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याने या बाबत वारंवार तपासणी केली. तपासणीअंतर्गत सोमवारी अखेर कनिष्ठ अभियंता सयद करीम खान यांच्या फिर्यादीवरून समिती अध्यक्षा मीनाक्षी विजयकुमार पाटील व समितीचे सचिव व ग्रामसेवक एच. एस. सावंत या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.