एमआयएम पक्षाचे नेते खासदार अकबरउद्दीन ओवेसी यांची चौकशी करण्याचे आदेश जुना राजवाडा पोलिसांना येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी गुरुवारी दिले. या प्रकरणी अॅड.युवराज जाधव यांनी याचिका दाखल केली होती.     
हैदराबाद येथे २४ डिसेंबर रोजी खासदार ओवेसी यांची सभा झाली होती. सभेमध्ये त्यांनी हिंदू धर्मीयांच्या भावना दुखविणारे तसेच देशविघातक विधान केले होते. या प्रकरणी त्यांना आंध्र प्रदेश पोलिसांनी अटकही केली होती. खासदार ओवेसी यांचे हे कृत्य हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचविणारे, देशद्रोही असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीची याचिका अॅड.जाधव यांनी केली होती. त्याची आज सुनावणी झाली. मुख्य न्यायदंडाधिकारी ए.एम.ताम्हाणे यांनी खासदार ओवेसी यांची चौकशी करून कारवाईचा अहवाल सादर करण्याचा आदेश पोलिसांना दिला.