सोशल नेटवìकग साइट्समुळे अनेक मित्रमत्रिणी एकत्र आले असे आपण नेहमीच ऐकत असतो. याचबरोबरीला अनेक कुटुंबही एकत्र आली आहेत. वर्षांनुवष्रे परदेशात वास्तव्यास असलेल्यांची नाळ या साइट्समुळे पुन्हा एकदा भारतीय नातेवाईकांशी जोडली गेली, पण फेसबुकसारख्या व्यासपीठावर कुणीही कुणाचेही प्रोफाइल तपासू शकते. यामुळे काही गोष्टी फक्त कुटुंबापुरत्याच मर्यादित असाव्यात, असे ज्यांना वाटते ती मंडळी फेसबुकला तितकेसे सुरक्षित समजत नाहीत किंवा मन मोकळे करीत नाहीत. अशांसाठी ‘इमली डॉट कॉम’ या कुटुंबवत्सल सोशल नेटवìकग साइटची सुरुवात झाली.
कुटुंबातील सर्वात मोठय़ा व्यक्तीपासून ते सर्वात लहान व्यक्तीची माहिती यामध्ये आपण सुरक्षितपणे टाकू शकतो. देशातील कुटुंबांमधील नाती अधिक घट्ट व्हावीत, या उद्देशाने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. आयआयटीचे माजी विद्यार्थी आतिश देढिया यांची पेबस्टोन इन्फोटेक नावाची कंपनी असून ते मोबाइल अ‍ॅप्स आणि सोशल नेटवìकगमध्ये काम करतात. त्यांच्या एका कौटुंबिक कार्यक्रमात त्यांना ही संकल्पना सुचली आणि त्यांनी ती अमलात आणली. अनेकांना आपल्या कुटुंबाचा इतिहास माहिती नसतो, तसेच पूर्वजांचीही माहिती नसते, इतकेच काय तर सध्या आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचीही माहिती नसते. ही माहिती एकत्र व्हावी याउद्देशाने के’ी.ूे हे अ‍ॅप सुरू झाले. या संकेतस्थळावर आत्तापर्यंत ७५ हजार २५४ जणांनी नोंदणी केली असून त्यांनी आपल्या नऊ लाख ६५ हजार ८४७ नातेवाईकांची माहिती अपलोड केली आहे. यातील एका सदस्याने आपल्या कुटुंबाचा लेखा-जोखा मांडला असून त्यात त्यांनी ६ हजार ६२४ नातेवाईकांच्या नोंदी केल्याचे कंपनीच्या अश्विनी हुंसिमर्द यांनी सांगितले.  
याच संकेतस्थळाचे आता अ‍ॅप गुगल प्लेवर उपलब्ध करून देण्यात आले असून या अ‍ॅपमुळे मोबाइलवरच सदस्यांना आपल्या नातेवाईकांची ओळख करून घेता येईल. यामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबाची डायरी, दूरध्वनी आदी माहिती शेअर करू शकता. म्हणजे तुमच्या कुटुंबातील एखाद्याला कुणाचा दूरध्वनी क्रमांक हवा असेल तर तो या माध्यमातून मिळवू शकतो. तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे वाढदिवस नोंदी तुम्ही यामध्ये केल्या तर तुम्हाला त्यांचे स्मरणही तीन दिवस आधी दिले जाते. हे अ‍ॅप https://play.google.com/store/apps/details?id=com.imlee.mobile  या िलकवर उपलब्ध आहे.
असे होते अ‍ॅपचे काम
तुम्ही एकदा अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यात लॉगइन करावे लागते. एकदा लॉगइन केल्यावर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना त्यात अ‍ॅड करून घेऊ शकता. यानंतर तुम्ही नातेवाईकांची माहिती शेअर करू शकता. तसेच एकमेकांचे प्रोफाइलही लिहू शकता. यातील फोन डायरी ही सर्वात उपयुक्त ठरत असल्याचेही अश्विनी यांनी स्पष्ट केले.