सुप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांना २०१३-१४ आणि ज्येष्ठ कीर्तनकार-निरूपणकार मारोती महाराज कुऱ्हेकर यांना २०१४-१५ चे ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार देण्याचे राज्य सरकारने सोमवारी जाहीर केले. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर या पुरस्कारांची घोषणा केली.
संतसाहित्यावर उत्कृष्ट लिखाण करणाऱ्यांना आणि मानवतावादी भूमिकेतून कार्य करणाऱ्यांना ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पाच लाख रुपये रोख, मानपत्र, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी रा. चिं. ढेरे, डॉ. दादा महाराज मनमाडकर, जगन्नाथ महाराज नाशिककर, रामकृष्ण महाराज लिहवीतकर, डॉ. यू. म. पठाण आदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
फादर दिब्रिटो यांनी बायबलचे मराठीत भाषांतर केले असून त्यासाठी त्यांना राष्ट्रीय साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हिंदूू, बौद्ध, इस्लाम, जैन आदी धर्माचा आणि महाराष्ट्रातील संतसाहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. मारोती महाराज कुऱ्हेकर यांनी २३ व्या वर्षी शिक्षण संपवून १९५६ मध्ये आध्यात्मिक ओढीने आळंदी येथील वारकरी शिक्षणसंस्थेत प्रवेश घेतला. कीर्तनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन ते कीर्तन, प्रवचन व ज्ञानदानाचे कार्य पाच दशकांहून अधिक काळ करीत आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री तावडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या निवड समितीमध्ये सय्यद भाईल, भास्करराव आव्हाड, चैतन्य महाराज देगलूरकर, डॉ. प्रशांत सुरू, सिसिलिया काव्र्हालो, गुरुप्रसाद पाखमोडे यांचा समावेश होता.

Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
loksatta tarun tejankit award
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!