कळवा पूर्व परिसरातील मफतलाल झोपडपट्टीतील शांतीनगरमध्ये राहणारा रोहित रामाने (५) हा मुलगा घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला असून आठ दिवस उलटूनही त्याचा शोध लागलेला नाही. त्यामुळे त्याच्या शोधासाठी आता पोलीसही सरसावले आहेत.
२२ ऑक्टोबर रोजी रोहित घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला. अनोळखी व्यक्तीने त्याला पळवून नेल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी आता त्याची माहिती आणि फोटो प्रसारित केले आहेत. उंची तीन फूट, रंग गोरा, डोळे काळे असे रोहितचे वर्णन असून त्याने सफेद रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट परिधान केली आहे. रोहित कुणाला सापडल्यास त्यांनी कळवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.