क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या सर्वागीण उपाययोजनांमध्ये महानगरपालिकेकडून आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले. खासगी डॉक्टरांकडून उपचार घेत असलेल्या क्षयरोग रुग्णांना मोफत औषधांसाठी आता ई-व्हाऊचरची पद्धत अमलात आणली जाणार आहे.
गेल्या काही वर्षां्त प्राथमिक पातळीवरील औषधांचा उपयोग होत नसलेल्या क्षयरोग्यांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. अर्धवट राहिलेल्या उपचारांमुळे ही परिस्थिती ओढवते. खासगी डॉक्टरांकडून उपचार घेत असलेले रुग्ण काही काळानंतर औषधे घेण्याचे बंद करतात. औषधांचा न परवडणारा खर्च व योग्य तो पाठपुरावा केला जात नसल्याने या रुग्णांचा आजार पुढच्या पातळीवर जातो. ही साखळी तोडण्यासाठी पालिकेने बिल अॅण्ड मेिलडा गेट्स फाऊंडेशनच्या सहकार्याने रुग्णांना आíथक साहाय्य करण्यास सुरुवात केली. त्यानुसार आतापर्यंत शहरातील चार हजार खासगी डॉक्टरांना प्रशिक्षण देऊन या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे. या डॉक्टरांकडे संभाव्य क्षयरोग रुग्ण आल्यास त्याला या योजनेत सहभागी झालेल्या ८८ पकी एका रुग्णालयात पाठवले जाते. तेथील छातीविकारतज्ज्ञांकडून आलेल्या अहवालानुसार जिन एक्स्पर्ट चाचणी केली जाते. यातील एक्स रे मोफत तर जिन एक्स्पर्ट चाचणी २५ टक्के किमतीत केली जाते. क्षयरोग असल्याचे निश्चित झाल्यावर डॉक्टरकडून औषधे लिहून दिली जातात. या योजनेतील ९२ मेडिकल दुकानांमधून ही औषधे रुग्णांना मोफत मिळतात. आतापर्यंत चार हजार रुग्णांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
आता पालिकेने याबाबत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. डॉक्टर, एक्स रे केंद्र, जिन एक्स्पर्ट केंद्र, मेडिकल दुकान यात धावाधाव करताना हातातली पावती गहाळ होण्याची तसेच त्यात गोंधळ होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन आता औषधांसाठी ई-व्हाऊचर पद्धती अमलात आणली जाणार आहे. यानुसार डॉक्टरांनी कॉल सेंटरला रुग्णाचे नाव व औषधे कळवायची आहेत. त्यानंतर त्यांना एक क्रमांक दिला जाईल. हाच क्रमांक रुग्ण व संबंधित मेडिकल दुकानदारांकडे पाठवला जाईल. रुग्णाने स्वत:चे नाव व क्रमांक सांगितल्यावर त्याला मोफत औषधे मिळतील. कॉल सेंटरला याची माहिती दिली जाईल. डॉक्टरांकडून दुजोरा मिळाल्याची खात्री करून मेडिकल दुकानाला पसे दिले जातील.
हे कॉल सेंटर गुरगाव येथील असून त्यांच्याकडून संपूर्ण मुंबईसाठी ही सेवा दिली जाईल. त्यामुळे रुग्णांची सोय होईल तसेच कार्यात अधिक पारदर्शकता येईल, असे पालिकेचे क्षयरोग निर्मूलन सल्लागार डॉ. अरुण बामणे यांनी सांगितले.