अमरावतीच्या शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेत झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ भूगोल विभागाने सलग तिसऱ्या वर्षी पहिले पारितोषिक पटकावले. एम.ए. प्रथम वर्षांचा विद्यार्थी शेख महंमद दस्तगीर या विद्यार्थ्यांने ‘सामाजिक प्रश्नांचे अभिक्षेत्रीय विश्लेषण’ या विषयावर पहिले, तसेच गोविंद चाटे याने तिसरे पारितोषिक मिळविले. या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख डॉ. केशव उके, डॉ. मदन सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.
कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे, बीसीयूडीचे संचालक डॉ. मुरलीधर शिनगारे, कुलसचिव डॉ. धनराज माने यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.